घरताज्या घडामोडीशीना बोरा हत्याकांड: पीटर मुखर्जीची अखेर सुटका!

शीना बोरा हत्याकांड: पीटर मुखर्जीची अखेर सुटका!

Subscribe

पीटर मुखर्जीला जामीन मंजूर करताना मुंबई उच्च न्यायालयाने अनेक अटी घातल्या आहेत.

शीना बोरा हत्याकांडातील आरोपी पीटर मुखर्जी चार वर्षानंतर आर्थर रोड तुरुंगातून बाहेर आला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने ६ फेब्रुवारी रोजी पीटर मुखर्जीला सशक्त जामीन मंजूर केला होता. मात्र, सीबीआयला सर्वोच्च न्यायालयात अपिल करता यावी म्हणून या निर्णयाला सहा आठवड्यांसाठी स्थगिती देण्यात आली होती. मात्र, सीबीआयने सर्वोच्च न्यायालयात अपिल केली नाही. यामुळे त्याची आज सुटका करण्यात आली.

पीटर मुखर्जीला जामीन मंजूर करताना मुंबई उच्च न्यायालयाने अनेक अटी घातल्या आहेत. पासपोर्ट सीबीआयकडे जमा करणे, न्यायालयाच्या परवानगीविना देश सोडून जाऊ नये, मुलगी विधी व मुलगा राहुल यांच्यासह खटल्यातील अन्य साक्षीदारांशी संपर्क साधू नये, खटल्याच्या सुनावणीत तहकुबी घेऊ नका, जर खटल्याच्या सुनावणीत वारंवार तहकुबी घेतल्यास जामीन रद्द होण्याकरिता सीबीआयला अर्ज करण्याची मुभा राहील, अशा अटी न्यायालयाने घातल्या आहेत.

- Advertisement -

हेही वाचा – जनता कर्फ्यूच्या दिवशी २४०० रेल्वे गाडया रद्द

गेल्या महिन्यात शीना बोरा हत्या प्रकरणातील आरोपी पीटर मुखर्जीला जामीन मंजूर करण्यात आला होता. मात्र या जामीनावर ६ आठवड्यांची स्थगिती देण्यात आली आहे. सीबीआयच्या विनंतीनंतर उच्च न्यायालयाचा हा निर्णय़ घेतला होता. मात्र, सीबीआयने सर्वोच्च न्यायालयात अपिल न केल्यामुळे आज त्याची सुटका झाली.

शीना बोरा हत्याकांड प्रकरणातील मुख्य आरोपी इंद्राणी मुखर्जीसह पीटर मुखर्जी, संजीव खन्ना आणि ड्रायव्हर श्याम राय या सर्वांवर २०१७ मध्ये हत्येचा आरोप निश्चित करण्यात आला. शीना बोराची एप्रिल २०१२ मध्ये निर्घृण हत्या करण्यात आली होती. २०१६ मध्ये पोलिसांनी शीनाची आई इंद्राणी आणि तिचा पहिला पती संजीव खन्ना आणि ड्रायव्हर श्यामवर राय याला अटक केली होती. तर इंद्राणीचा दुसरा पती पीटर मुखर्जीवर गुन्ह्याची माहिती लपवणे आणि कटात सहभागी होणे, असे आरोप ठेवत सीबीआयने अटक केली होती.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -