घरट्रेंडिंगपेट्रोल-डिझेल दरवाढीचा भडका कायम!

पेट्रोल-डिझेल दरवाढीचा भडका कायम!

Subscribe

मुंबईमध्ये आजचा पेट्रोलचा दर ८७ रुपये ७७ पैसे झाला असून, डिझेल ७६.९८ रुपयांवर पोहोचले आहे. दरम्यान आजही अमरावती शहरात पेट्रोलचा दर सर्वात महाग आहे.

पेट्रोल-डिझेलची दरवाढ आजही कायम आहे. या महिन्यातील सलग आठव्या दिवशीही इंधन दरातील वाढ कायम आहे. आज पेट्रोल ३९ पैशांनी महागले असून डिझेल ४७ पैशांनी महाग झाले आहे. त्यामुळे वाढीव दरानुसार मुंबईमध्ये आजचा पेट्रोलचा दर ८७ रुपये ७७ पैसे झाला असून, डिझेल ७६.९८ रुपयांवर पोहोचले आहे. दरम्यान आजही अमरावती शहरात पेट्रोलचा दर सर्वात महाग आहे. अमरावतीमध्ये आज पेट्रोलचा दर ८९.०३ रुपये प्रतिलिटर इतका आहे. काल म्हणजेच शुक्रवारी देखील अमरावतीमध्ये पेट्रोलचा दर (८८.७१ रुपये इतका) सर्वात महाग होता. दिवसागणीक वाढत चाललेले पेट्रोल-डिझेलचे भाव लवकरच शंभरी गाठतील अशी भीती सर्वसामान्य जनतेकडून व्यक्त केली जात आहे. आधीच महागाईमुळे त्रस्त असलेल्या सर्वसामान्य लोकांना पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीचा त्रास सहन करावा लागतो आहे. ऐन सणासुदीच्या पार्श्वभूमीवर होत असलेल्या या इंधन दरवाढीमुळे लोक हैराण झाले आहेत.


खास रिपोर्ट : का वाढतात पेट्रोल – डिझेलचे दर?

गेल्या १५ दिवसांतील दरवाढीची आकडेवारी

petrol diesel hike
मागील १५ दिवसांत पेट्रोल-डिझेलच्या दरात सातत्याने झालेली वाढ (सौजन्य- petroldieselprice.com)

वाचा : पेट्रोल – डिझेलच्या वाढत्या किमती आणि आंतरराष्ट्रीय राजकारण!

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -