घरमहाराष्ट्रमराठमोळ्या प्रथमेशला मिळाला 'मोस्ट आऊटस्टॅण्डिंग डेलीगेट्स' पुरस्कार

मराठमोळ्या प्रथमेशला मिळाला ‘मोस्ट आऊटस्टॅण्डिंग डेलीगेट्स’ पुरस्कार

Subscribe

‘बाली एशिया इंटरनॅशनल मॉडेल युनायटेड नेशन्स’ या जगभरातील विद्यार्थ्यांच्या आंतरराष्ट्रीय परिषदेत प्रथमेश डोळे या विद्यार्थ्याला 'मोस्ट आऊटस्टॅण्डिंग डेलीगेट्स' पुरस्कार मिळाला आहे. हा पुरस्कार मिळवणारा प्रथमेश हा महाराष्ट्रातील एकमेक विद्यार्थी आहे.

इंडोनेशियातील नुसादुआ येथे झालेल्या ‘बाली एशिया इंटरनॅशनल मॉडेल युनायटेड नेशन्स’ या जगभरातील विद्यार्थ्यांच्या आंतरराष्ट्रीय परिषदेत कल्याणचा विद्यार्थी प्रथमेश डोळे याने मराठीचा झेंडा रोवला आहे. आंतरराष्ट्रीय घडामोडींकर उत्कृष्ट भाषण केल्याबद्दल त्याला मोस्ट आऊटस्टॅण्डिंग डेलीगेट्स पुरस्कार मिळाला आहे. हा पुरस्कार मिळवणारा प्रथमेश हा महाराष्ट्रातील एकमेक विद्यार्थी आहे. इंडोनेशियातील इंटरनॅशनल ग्लोबल नेटवर्क या संस्थेच्या वतीने  विद्यार्थ्यांसाठी दरवर्षी  ‘युनायटेड नेशन्स’च्या धर्तीकर ‘एशिया इंटरनॅशनल मॉडेल युनायटेड नेशन्स’ भरवण्यात येते.

इस्राईल देशाची भूमिका केली स्पष्ट

पाणी,  दहशतवाद, राजकारण, अर्थ, पर्यावरण, गरिबी, बेरोजगारी आदी विविध विषयांवर जागतिक पातळीकर तरुण अभ्यासक तयार व्हावेत हा त्यामागे उद्देश आहे. २२ ते २५ मार्च या दरम्यान बालीमधील नुसादुआ येथे झालेल्या परिषदेत विविध देशांमधील ४६९ विद्यार्थी सहभागी झाले होते. या परिषदेत प्रथमेश डोळे याचाही समावेश होता. त्याला आयएमएफ (इंटरनॅशनल मॉनेटरी फंड) या क्षेत्रातील  ‘क्रिप्टो करन्सी इन सस्टेनेबल इकॉनॉमी’ हा विषय देण्यात आला होता. या विषयात त्याने इस्राईल देशाच्यावतीने भूमिका स्पष्ट केली. प्रथमेशने अत्यंत प्रभावीपणे हा विषय मांडला. त्याच्या सादरीकरणाबद्दल ‘मोस्ट आऊटस्टॅण्डिंग डेलीगेट्स’ पुरस्कार देण्यात आला. प्रमाणपत्र आणि ट्रॉफी असे प्रमाणपत्राचे स्वरूप आहे. सिद्धार्थ कॉलेज ऑफ लॉमध्ये सध्या तो कायद्याचे शिक्षण घेत असून शेवटच्या वर्षाला आहे. ठाण्याच्या जोशी-बेडेकर महाविद्यालयातून त्याने बीएची पदकी घेतली असून ऑलियन्स फ्रान्सिस या संस्थेतून फ्रेंच भाषेचीही पदवी मिळवली आहे.

- Advertisement -

‘भारत माता की जय’चा नारा 

प्रमाणपत्र व ट्रॉफी असे या पुरस्काराचे स्वरूप असून ‘इंटरनॅशनल ग्लोबल नेटवर्क’चे अध्यक्ष मोहम्मद फरीझल व सेक्रेटरी जनरल अंगुरो पंडितो यांच्या उपस्थितीत हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. प्रथमेश डोळे याने पुरस्कार घेतल्यानंतर खड्या आवाजात व्यासपीठावरूनच ‘भारत माता की जय’.. अशा घोषणा दिल्या तेव्हा सभागृहातील शेकडो विद्यार्थ्यांनी टाळ्यांचा कडकडाट केला. इंडोनेशियात मराठीचा झेंडा रोवल्याबद्दल त्याचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

या आंतरराष्ट्रीय परिषदेचा अनूभव फार वेगळा होता. ज्यापद्धतीने ते डिबेट आयोजित करतात ते सगळं फार वेगळं होतं. संयुक्त राष्ट्र संघटनेचे जसे डिबेट होतात, अगदी हुबेहुब डिबेट याठिकाणी आयोजित करण्यात आले होते. या डिबेटचा उद्दिष्ट असा होता की, जागतिक पातळीकर तरुण अभ्यासक तयार व्हावेत. त्यामुळे मला इस्राईल देशाची बाजू मांडण्याची संधी मिळाली. येथील डिबेट हे सर्वसामान्य डिबेटपेक्षा फार वेगळे होते.
– प्रथमेश डोळे
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -