घरमहाराष्ट्रपंतप्रधान करणार राज्यातील २५ रुसा प्रकल्पांचे डिजीटल लाँचिंग

पंतप्रधान करणार राज्यातील २५ रुसा प्रकल्पांचे डिजीटल लाँचिंग

Subscribe

पंतप्रधान नरेंद मोदी यांच्या हस्ते राष्ट्रीय उच्चस्तर शिक्षा अभियान २.० (रुसा) या कार्यक्रमांतर्गत व्हिडिओ कॉन्फरंसींगच्या माध्यमातून राज्यातील २५ रुसा अंतर्गत प्रकल्पांच्या डिजीटल लाँचींगचा कार्यक्रम पार पडणार आहे.

पंतप्रधान नरेंद मोदी यांच्या हस्ते राष्ट्रीय उच्चस्तर शिक्षा अभियान २.० (रुसा) या कार्यक्रमांतर्गत रविवार, ३ फेब्रुवारी रोजी दुपारी ३.४५ वाजता व्हिडिओ कॉन्फरंसींगच्या माध्यमातून राज्यातील २५ रुसा अंतर्गत प्रकल्पांच्या डिजीटल लाँचींगचा कार्यक्रम पार पडणार आहे. मुंबईत चर्चगेट येथील सेंट झेवियर्स येथे होणाऱ्या २ रुसा प्रकल्पांच्या डिजीटल लाँचिगच्या कार्यक्रमाप्रसंगी उच्च व तंत्रशिक्षणमत्री विनोद तावडे उपस्थित राहणार आहेत. रुसा अंतर्गत वाशिम जिल्ह्यातील मंगळूरपीर तालुक्यातील चिखली येथील नवीन शासकीय मॉडेल डिग्री कॉलेजचा कोनशिला अनावरण समारंभ त्याचप्रमाणे नंदुरबार जिल्ह्यातील नवीन शासकीय मॉडेल डिग्री कॉलेजचा अनावरण समारंभ डिजीटल लाँचिंगच्यामार्फत पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते होणार आहे. त्याचप्रमाणे रुसा अंतर्गत महाराष्ट्राला स्वायतत्ता मिळालेल्या खालील महाविद्यालयांचे डिजीटल लाँचिग होणार आहे. केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालय, महाराष्ट्र सरकार आणि उच्च व तंत्रशिक्षण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने व्हिडीओ कॉन्फरंसींगच्या माध्यमातून डिजीटल लाँचिंगचा कार्यक्रम होणार आहे.

वाचा – अपमानास्पद वागणूक देऊन देखील शरद पवार काँग्रेससोबत – नरेंद्र मोदी

- Advertisement -

महाविद्यालयांना शैक्षणिक स्वायतत्ता देण्याचे शासनाचे धोरण

शिक्षणाचा दर्जा वाढवण्यासाठी महाविद्यालयांना जागतिकीकरणाच्या वेगाबरोबर रोजगारभिमुख नवनवीन अभ्यासक्रम संशोधन व विकास तसेच नवोपक्रम राबवण्यासाठी महाविद्यालयांना शैक्षणिक स्वायतत्ता देण्याचे शासनाचे धोरण आहे. सदर संकल्पनेचा पुढील टप्पा म्हणून स्वायतत्ता प्रदान केलेल्या महाविद्यालयांना शैक्षणिक स्वायतत्ता योग्यप्रकारे अंमलात आणण्यासाठी भौतिक संरचना व पायाभूत सुविधाकरिता राष्ट्रीय उच्चस्तर शिक्षा अभियान (रुसा) अंतर्गत आर्थिक सहाय्य देण्यात येते.

वाचा – सामनातून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका

रुसाच्या या २२ महाविद्यालयांना स्वायतत्ता मिळाली – 

  • जय हिंद कॉलेज (मुंबई)
  • सेंट झेवियर्स कॉलेज (मुंबई)
  • रामनरीन रुईया कॉलेज (मुंबई)
  • मिठीबाई कॉलेज ऑफ आर्टस, चौहान इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, ए. जी. कॉलेज ऑफ कॉमर्स अँड इकोनॉमिक्स (मुंबई)
  • डॉ. भानूबेन महेंद्र नानावटी ऑफ होम सायन्स (मुंबई)
  • हंसराज जीवनदास कॉलेज ऑफ एज्युकेशन (मुंबई)
  • एसआयईएस कॉलेज ऑफ आर्टस, सायन्स अॅण्ड कॉमर्स (मुंबई),
  • सोफीया कॉलेज ऑफ वूमन (मुंबई)
  • चिकीत्सक समूहास सन सीताराम अँड लेडी शांताबाई पाटकर कॉलेज ऑफ आर्टस अँड सायन्स अँड व्ही. पी. वर्दे कॉलेज
  • ऑफ कॉमर्स अँड इकोनॉमिक्स (मुंबई)
  • गुरु नानक खालसा कॉलेज ऑफ आर्टस सायन्स अँड कॉमर्स (मुंबई)
  • बी. के. बिर्ला कॉलेज ऑफ आर्टस, सायन्स अँड कॉमर्स (ठाणे)
  • रयत शिक्षण संस्था कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेज (रायगड)
  • चांगू काना ठाकूर आर्टस, कॉमर्स अँड सायन्स (रायगड)
  • सिमबॉयसेस कॉलेज ऑफ आर्टस अँड कॉमर्स, सेनापती बापट (पुणे)
  • सर परशुरामभाऊ कॉलेज, पुणे, सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी (पुणे)
  • छत्रपती शिवाजी कॉलेज (सातारा)
  • तुलजाराम चतुरचंद कॉलेज ऑफ आर्टस, सायन्स अँड कॉमर्स बारामती (पुणे)
  • यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स (सातारा)
  • सदगुरु गाडगे महाराज कॉलेज, कराड (सातारा)
  • धनंजयराव गाडगीळ कॉलेज ऑफ कॉमर्स (सातारा)
  • कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय, पंढरपूर (सोलापूर)
  • छत्रपती शाहू इन्स्टिट्यूट ऑफ बिझनेस एज्युकेशन अँड रिसर्च (कोल्हापूर)
  • सावित्रीबाई फुले विद्यापीठ (पुणे)
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -