घरदेश-विदेशBudget 2019 : 'शेतकऱ्यांचे जीवन उद्ध्वस्त करणारा अर्थसंकल्प'

Budget 2019 : ‘शेतकऱ्यांचे जीवन उद्ध्वस्त करणारा अर्थसंकल्प’

Subscribe

'अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना १७ रुपये प्रति दिवस देऊन तुम्ही त्यांचा अपमान केला आहे', अशी टीका राहुल गांधी यांनी केली आहे.

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनीही आज सादर झालेल्या अर्थसंकल्पावर सडकून टीका केली आहे. राहुल गांधी यांनी त्यांच्या अधिकृत ट्वीटर अकाउंटवरुन याविषयी आपलं परखड मत मांडलं आहे. राहुल यांनी केलेल्या ट्वीटमध्ये त्यांनी म्हटलं आहे की, ‘डिअर नोमो, तुमच्या अक्षमता, अपात्रता आणि उद्धटपणाच्या ५ वर्षांच्या सत्तेमुळे शेतकऱ्यांचे जीवन उद्धवस्त केले आहे. शेतकऱ्यांना १७ रुपये प्रति दिवस देऊन तुम्ही त्यांचा अपमान केला आहे’. प्रभारी अर्थमंत्री पीयूष गोयल यांनी लोकसभेत अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पावरुन सर्वपक्षीय विरोधकांनी टीकेची झोड उठवली आहे. ‘आज सादर झालेला अर्थसंकल्प हा लोकांची दिशाभूल करणारा, त्यांच्या डोळ्यात धूळफेक करणारा आहे, तसंच हा केवळ एक चुनावी जुमला आहे…’ अशा प्रकारच्या प्रतिक्रिया विरोधकांनी दिल्या आहेत. यापाठोपाठ राहुल गांधी यांनीही अर्थसंकल्पाच्या मुद्द्यावरुन भाजप सरकारवर निशाणा साधला आहे.

 

- Advertisement -

शेतकऱ्यांसाठी मोदी सरकारची योजना काय?

आज सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पात, ‘दुष्काळ आणि नापिकीचा सामना करणाऱ्या अल्पभूधारक शेतकऱ्यांना वर्षाला ६ हजार रुपयांची मदत जाहीर करणार असल्याचं’ जाहीर करण्यात आलं. याशिवाय शेतकऱ्यांना दोन हेक्टरपर्यंत शेतजमिनीच्या मालकीचा लाभ मिळणार आहे. ही योजना आमलात आणण्यासाठी वर्षाला ७५ हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आल्याचं आजच्या अर्थसंकल्पात मांडण्यात आलं आहे.


वाचा : अर्थसंकल्पावर बरसले विरोधक, पाहा काय म्हणाले…

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -