घरताज्या घडामोडीबारसू रिफायनरी वाद : रत्नागिरीत ११ मे पर्यंत मनाई; चाकरमानी हैराण

बारसू रिफायनरी वाद : रत्नागिरीत ११ मे पर्यंत मनाई; चाकरमानी हैराण

Subscribe

बारसू येथील प्रस्तावित रिफायनरी प्रकल्पावरून जोरदार राजकारणाचे वारे वाहत आहेत. या रिफायनरीवरून राजकीय नेतेमंडळी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत. अशातच सरकारने येत्या 11 मेपर्यंत रत्नागिरीत मनाई आदेश लागू केले आहेत.

बारसू येथील प्रस्तावित रिफायनरी प्रकल्पावरून जोरदार राजकारणाचे वारे वाहत आहेत. या रिफायनरीवरून राजकीय नेतेमंडळी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत. अशातच सरकारने येत्या 11 मेपर्यंत रत्नागिरीत मनाई आदेश लागू केले आहेत. त्यामुळे या रिफायनरीच्या वादाचा फटका आता कोकणात जाणाऱ्या प्रवाशांना बसण्याची शक्यता आहे.

मे महिन्याच्या सुट्टीचा आनंद लुटण्यासाठी सर्वांनी कोकणाची वाट धरली आहे. मुंबईसह राज्याच्या अनेक भागांतून चाकरमानी कोकणात जात आहेत. कोकणाचे सौदर्य डोळ्यांत टीपण्यासाठी रेल्वे गाड्याही प्रवाशी आणि पर्यटकांनी भरून जात आहेत. मात्र, मनाई आदेशामुळे कोकणात जाणारे चाकरमानी संताप व्यक्त करत आहेत. (Prohibitory order under Section 37 1 3 of the Maharashtra Police Act 1951 is in force in Ratnagiri till May 11)

- Advertisement -

मनाई आदेशाचे कारण काय?

बारसू (राजापूर) येथे सुरू असलेल्या माती परीक्षण प्रक्रियेला होणारा विरोध, १ मे या कामगार दिनाच्या अनुषंगाने विविध ठिकाणी होणारी आंदोलने, ५ मे रोजी बौद्ध पौर्णिमा सण या अनुषंगाने किरकोळ कारणावरून कोणताही अनुचित प्रकार घडून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी आजपासून ११ मे पर्यंत जिल्ह्यात महाराष्ट्र पोलिस अधिनियम १९५१ चे कलम ३७ (१) (३) अन्वये मनाई आदेश लागू करण्यात आला आहे.

- Advertisement -

रिफायनरीवरून राणे-राऊतांची जुंपली

‘उद्धव ठाकरेंनी कोकणात येऊन दाखवावेच. आम्ही आहोत, बघूया काय होते ते. कोकणात येण्याची तारीख त्यांनी जाहीर करावी. आम्ही पण येतो तिकडे, बघूया होऊन जाऊ दे एकदाचं काय ते. कोकणातून मुंबईला पळून जाण्यासाठी किती किलोमीटर जावे लागेल याचा विचार करावा आणि चालण्याची ताकद नसणार्‍यांनी पळण्याचा विचारसुद्धा करू नये’, असा हल्लाबोल नारायण राणेंनी उद्धव ठाकरेंवर केला.

‘कोकण काय नारायण राणेंच्या बापाचे आहे का? येथे पाय ठेवू देणार नाही, तिथे पाय ठेवू देणार नाही, तुमचे पाय कुठे आहेत ते पाहा. काय आणि कोणाशी बोलताय? आपण केंद्रीय मंत्री आहात. पाय ठेवू देणार नाही म्हणजे कोणाची दलाली करीत आहात. कोकणात एकदा नाही तर दोनदा आपण पराभूत झाला आहात. केंद्रीय मंत्री आहात प्रतिष्ठेने राहा. महाराष्ट्राची प्रतिष्ठा धुळीस मिळवू नका’, अशा शब्दांत संजय राऊतांनी नारायण राणे यांना प्रत्युत्तर दिले.


हेही वाचा – रत्नागिरी पर्यटनासाठी MTDCची जाहीरात, नेटकऱ्यांनी बारसू रिफायनरीवरुन केले ट्रोल

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -