घरमहाराष्ट्रआज मुंबईत मराठा क्रांती मोर्चाचे निषेध आंदोलन

आज मुंबईत मराठा क्रांती मोर्चाचे निषेध आंदोलन

Subscribe

मुंबई : मराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसलेल्या कार्यकर्त्यांवर शुक्रवारी पोलिसांनी लाठीचार्ज केला होता. या आनंदोलनात अनेक जखमी झाले होते. या घटनेच्या निशेधार्थ राज्यात ठिकठिकाणी शनिवारी आंदोलन झाले. या पार्श्वभूमीवर आज मुंबईतील दादर प्लाझा सकाळी 11 वाजता मराठा क्रांती मोर्चाचे राज्य सरकारविरोधात निदर्शन आंदोलन करणार आहे.

या आंदोलनात काळ्या फिती बांधून सरकारचा निषेध करणार असून या आंदोलनातून राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी करणार आहे. या आंदोलनात मराठा क्रांती मोर्चाचे प्रमुख नेते आणि अनेक मराठा कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. दादरच्या प्लाझा सिनेमासमोर राज्य सरकारविरोधात निदर्शने करण्यात येणार आहेत.

- Advertisement -

हेही वाचा – लाठीचार्जनंतर राजकारण ‘चार्ज’! शरद पवार, उद्धव ठाकरेंसह दोन्ही राजेंची आंदोलकांशी चर्चा

नाशिक बंदची हाक

सकल मराठा समाज नाशिक आणि मराठा क्रांती मोर्चा नाशिक यांच्या वतीने आज संपूर्ण जिल्ह्यात बंदची हाक दिली आहे. आज सकाळी 11 वाजता नाशिकच्या छत्रपती शिवाजी महाराज पुतळा आणि जिल्हाधिकारी कार्यालय समोर येथे मराठा कार्यक्रत्यांना जमण्याचे आवाहन करण्यात आले आहे. नाशिक येथील व्यावसायिक आणि उद्योजकांना देखील बंद यशस्वी करण्यासाठी आवाहन करम्यात आले आहे.

- Advertisement -

हेही वाचा – जालन्यातील घटनेचे तीव्र पडसाद; काय म्हणताय नाशिक मधील मराठा संघटना ?

बुलढाण्याच ‘मविआ;कडून रास्ता रोको आंदोलन

जालना घटनेच्या निषेधार्थ आज बुलढाणा जिल्ह्यात महाविकास आघाडीच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे. यात नांदुरा, बुऱ्हानपूर आणि जळगाव मार्गावर महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी आज सकाळी पाच वाचल्यापासून रस्ता रोको आंदोलनाने सुरुवात केली आहे. यामुळे महामार्गावरील वाहतूक तीन तासांपासून ठप्प झाली आहे. तर पोलिांनी रास्ता रोको करणाऱ्या आंदोलनकांना ताब्यात घेतले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -