घरthaneभिवंडीमध्ये दोन मजली इमारत कोसळली; 2 जणांचा मृत्यू, 5 जखमी

भिवंडीमध्ये दोन मजली इमारत कोसळली; 2 जणांचा मृत्यू, 5 जखमी

Subscribe

मुंबई :भिवंडी शहरातील गौरीपाडा परिसरामधील दोन मजली इमारत मध्यरात्रीच्या सुमारास कोसळली. यात दोन जणांचा मृत्यू झाला असून पाच जण जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे. या घटनेची माहिती मिळताच स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेत ढिकाऱ्याखाली दबलेल्या लोकांना बाहेर काढण्यास सुरुवात केली. स्थानिकांच्या मदतीने चार जणांना सुखरूप बाहेर काढण्यात आले.

या घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या तीन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली सहा जण अडकल्याचे समजल्यानंतर अग्निशामक दलाच्या जवांनांनी चार जणांना सुखरुप बाहेर काढण्यात यश आले, तर दोणांचा मृत्यू झाले. इमारतीच्या ढिगाऱ्यातून बाहेर काढलेल्या जखमींवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू असून एकाची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळली आहे.

- Advertisement -

हेही वाचा – लाठीचार्जनंतर राजकारण ‘चार्ज’! शरद पवार, उद्धव ठाकरेंसह दोन्ही राजेंची आंदोलकांशी चर्चा

पालिकेकडून इमारत दोन वेळा नोटीस

भिवंडीतील गौरीपराडा परिसरातील ही इमारत जवळपास 40 ते 45 वर्ष जुनी असल्याची माहिती मिळाली आहे. भिवंडी महानगरपालिकेने या इमारतील दोन वेळा नोटीस बजावल्याची माहिती मिळाली आहे. या इमारतीच्या तळमजल्यावर यंत्रमाग कारखाना होता. पालिकेने इमारत धोकादायक असल्याची नोटीस बजावण्याचे काम केले. या इमारतीतील रहिवाशांना बाहेर ढाकण्याचे काम केले नाही, अशी प्रतिक्रिया स्थानिकांनी व्यक्त केली आहे.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -