घरताज्या घडामोडीआपल्या वक्तव्यातून तेढ निर्माण होईल, अशी वक्तव्ये टाळावी : अजित पवार

आपल्या वक्तव्यातून तेढ निर्माण होईल, अशी वक्तव्ये टाळावी : अजित पवार

Subscribe

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते शिवाजीनगरच्या पोलीस संचलन मैदानात महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 62व्या वर्धापन दिनोत्सवानिमित्त ध्वजवंदन व संचलन समारंभ पार पडला. यावेळी या कार्यक्रमास गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांचीही प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमानंतर अजित पवार आणि राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते शिवाजीनगरच्या पोलीस संचलन मैदानात महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 62व्या वर्धापन दिनोत्सवानिमित्त ध्वजवंदन व संचलन समारंभ पार पडला. यावेळी या कार्यक्रमास गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांचीही प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमानंतर अजित पवार आणि राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी दिलीप वळसे पाटील यांनी सर्वांनी एकत्र काम करण्याचे आवाहन केले. शिवाय, “कोणतीही सभा घेताना पोलीस आयुक्तांची परवानगी आवश्यक असते. औरंगाबादेतल्या सभेला पोलिसांनी काही अटी घातल्या आहेत. त्याचे पालन संबंधितांनी करावे. म्हणजे वातावरण चांगले राहील”, असं वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची औरंगाबादेत सभा होणार आहे. या सभेच्या पार्श्वभूमीवर आजित पवार यांनी राज ठाकरेंवर हल्लाबोल केला आहे. “जातीय, धार्मिक सलोखा आपल्याला कायम ठेवायचा आहे. आपल्या वक्तव्यातून तेढ निर्माण होईल, वाद निर्माण होईल, अशी वक्तव्ये टाळावी, असे आवाहन अजित पवार यांनी केले आहे. तलवारींचा साठा सापडला आहे. त्याची माहिती पोलीस खाते घेत आहे. विद्ध्वंस घडवण्याचा काहींचा प्रयत्न असावा. त्या आत्ताच का सापडत आहेत, त्याचा मास्टरमाइंड कोण, याचा शोध सुरू आहे. पोलीस दल सगळीकडे चोख बंदोबस्त ठेवून आहे. तलवारीचा साठा सापडला त्यावर पोलीस जप्तीची कारवाई करत आहेत”, असं अजित पवार यांनी म्हटलं.

- Advertisement -

“आपण सर्वांनी शर्थीने या संकटावर मात केली. कोरोनाचे संकट कमी झाले असले तरी अजून ते संपले नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी निर्बंध जरी हटवले असले तरी सर्वांनी स्वच्छेने मास्क वापरला पाहिजे. आता कुठेलही निर्बंध नाहीय, मात्र राज्यात कोरोना रुग्ण संख्या वाढली आणि टास्क फोर्सने सूचना केली तर निर्बंध लागू शकतात”, असंही यावेळी अजित पवार यांनी म्हटलं.

कायदा आणि सुव्यवस्था आणि शांतता ठेवण्याची पोलीस विभागाची जबाबदारी

- Advertisement -

“राजकीय सभा आणि कार्यक्रम लोकशाहीत चालत राहणार आहेत. कायदा आणि सुव्यवस्था आणि शांतता ठेवण्याची पोलीस विभागाची जबाबदारी आहे. कुठल्याही परिस्थितीला सामोरे जाण्याच्या दृष्टीकोनातून सुंपूर्ण पोलीस विभाग तयार आहे. त्यामुळे कुठल्याही प्रकारची अनुचित घटना घडणार नाही अशी अपेक्षा आहे. सर्वांनी सामाजिक सलोखा राखण्याच्या दृष्टीकोनोतून सहकार्य करावे”, असं दिलीप वळसे पाटील यांनी म्हटलं.


हेही वाचा – LPG Cylinder Price: एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरात वाढ

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -