घरताज्या घडामोडीLPG Cylinder Price: एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरात वाढ

LPG Cylinder Price: एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरात वाढ

Subscribe

दिवसेंदिवस महागाई प्रचंड वाढत आहे. या वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून इंधनाच्या किंमती वाढत असून आता सरकारी ऑईल मार्केटिंग कंपनी ओएमसीएसने एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरात वाढ केली आहे.

दिवसेंदिवस महागाई प्रचंड वाढत आहे. या वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून इंधनाच्या किंमती वाढत असून आता सरकारी ऑईल मार्केटिंग कंपनी ओएमसीएसने एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरात वाढ केली आहे.

प्रति सिलिंडर 104 रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र ही दर वाढ घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात झाली नसून ती व्यावसायिक सिलिंडरच्या दरात करण्यात आली आहे. घरगुती सिलिंडरच्या दरात कोणताही बदल करण्यात आलेला नसून भाव स्थिर आहेत.

- Advertisement -

नव्या दरानुसार आता व्यवसायिक सिलिंडरचे दर प्रति सिलिंडर 2,355 रुपयांवर पोहोचले आहेत. दरम्यान आज व्यवसायिक गॅस सिंलिडरच्या दरात पुन्हा एकदा 104 रुपयांची वाढ झाल्याने महागाईचा भडका उडणार आहे. पेट्रोल, डिझेलचे दर वाढल्ये आधीच वाहतूक खर्चात वाढ झाली आहे. आता व्यवसायिक सिलिंडरच्या दरात पुन्हा एकदा 104 रुपयांची वाढ करण्यात आली आहे.

मार्च महिन्यात देखील व्यवसायिक सिलिंडरच्या दरात 268.50 रुपयांची वाढ करण्यात आली होती. दिवसेंदिवस दरवाढ होत असल्याने आता हॉटेलमधील जेवण देखील महाग होणार आहे. आज व्यवसायिक एलपीजी सिलिंडरच्या दरात वाढ करण्यात आली आहे. मात्र दुसरीकडे पेट्रोल, डिझेलेच दर आज देखील स्थिर आहेत. सलग 26 व्या दिवशी पेट्रोल, डिझेलचे दर स्थिर असल्याने सर्व सामान्यांना थोडा का होत नाही दिलासा मिळाला आहे.

- Advertisement -

पेट्रोल, डिझेलच्या दरात शेवटची दरवाढ सहा एप्रिल रोजी करण्यात आली होती. तेव्हापासून इंधनाचे दर स्थिर आहेत. 22 मार्च ते सहा एप्रिल या काळात पेट्रोल, डिझेलच्या दरात प्रति लिटरमागे दहा रुपयांपेक्षाही अधिक वाढ करण्यात आली आहे.


हेही वाचा – आज औरंगाबादेत राजगर्जना !

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -