घरमहाराष्ट्रपुणेPune Bangalore Highway : गाडीचा टायर फुटून भीषण अपघात; एकाच कुटुंबातील तीन...

Pune Bangalore Highway : गाडीचा टायर फुटून भीषण अपघात; एकाच कुटुंबातील तीन ठार, चार गंभीर

Subscribe

Pune Bangalore Highway Accident : पुणे-बंगळुरु राष्ट्रीय महामार्गावर (Pune Bangalore Highway Accident) टायर फुटून भीषण अपघात झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. गाडीचा अचानक टायर फुटला आणि गाडी समोरून दुसऱ्या गाडीला जाऊन धडकली. या अपघातात तवेरा गाडीतील तीनजण जागीच ठार तर, चारजण गंभीर जखमी आहेत. इतर जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. (Pune Bangalore Highway Car tire bursts in severe accident Three killed in the same family four serious)

हेही वाचा – बच्चू कडू यांच्या टीकेला शरद पवारांचे खोचक प्रत्युत्तर, म्हणाले – “कुणा गल्लीबोळातल्या लोकांबाबत…”

- Advertisement -

मुंबईहून जयसिंगपूरला जाणारी तवेरा गाडी सातारा शहराच्या हद्दीत बॉम्बे रेस्टॉरंट जवळ आल्यावर गाडीचा अचानक टायर फुटला आणि गाडी कोल्हापूरच्या दिशेने जाणाऱ्या बोलेरो पिकअपला गाडीला धडकली. आज सकाळी सात वाजण्याच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात तवेरा गाडीतून प्रवास करणारे निखिल श्रीकांत सवाखंडे (30), प्रियांका निखिल सवाखंडे (32), शशिकांत यदुनाथ सवाखंडे (63) या तिघांचा मृत्यू झाला आहे. इतर जखमींवर सातारा येथील क्रांतिसिंह नाना पाटील शासकीय जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हे सर्व रहिवासी कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातल्या जयसिंगपूर येथील आहेत.

हा अपघात एवढा भीषण होता की यामध्ये तवेरा गाडीचा चेंदामेंदा झाला आहे. या अपघाताची माहिती मिळताच सातारा शहर पोलीस घटनास्थळी दाखल झाली होते. घटनास्थळावरून अपघातग्रस्त गाड्या हटवल्या असून या अपघाताची नोंद सातारा शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

- Advertisement -

हेही वाचा – बच्चू कडू यांच्या टीकेला शरद पवारांचे खोचक प्रत्युत्तर, म्हणाले – “कुणा गल्लीबोळातल्या लोकांबाबत…”

आठवड्याभरापूर्वी मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर कंटेनरचा भीषण अपघात

आठवड्याभरापूर्वी 21 ऑगस्ट रोजी सकाळी 9 च्या सुमारास एम एच 46 ए आर 0181 हा कंटेनर पुण्याकडून मुंबईकडे येत होता. यावेळी पुण्याहून 35 किलोमीटरचा प्रवास केल्यानंतर कंटेनर मुंबईकडील लेन सोडून पुण्याकडे जाणाऱ्या लेनमध्ये घुसला आणि पलटी होऊन पुढे सरकत गेला. कंटेनरने पाच चारचाकी गाड्यांना धडक दिल्यामुळे मोठे नुकसान झाले होते. यावेळी एका गाडीमधील 1 महिला आणि चालकाचा जागीच मृत्यू झाला होता तर, दोन महिला गंभीर जखमी झाल्या होत्या. या भीषण अपघातामुळे पुण्याच्या दिशेने जाणारी वाहतूक संथ गतीने सुरू होती.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -