घरमहाराष्ट्रपुण्यात एसटीने घेतला पेट; सुदैवाने जीवितहानी टळली

पुण्यात एसटीने घेतला पेट; सुदैवाने जीवितहानी टळली

Subscribe

जुन्या कात्रज बोगद्याजवळ आज सकाळी अचानक एसटीला आग लागली. या आगीत सुदैवाने जिवीतहानी झाली नसल्याने मोठा अनर्थ टळला आहे.

पुणे – सातारा मार्गावरील जुन्या कात्रज बोगद्याजवळ आज सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास एका एसटीने अचानक पेट घेतला. अचानक एसटीने पेट घेतल्याने प्रवाशांची तारांबळ उडाली. आग वाढत असल्याचे पाहून प्रवासी प्रचंड घाबरले होते. मात्र त्याचवेळी रस्त्यावरुन जात असताना हा घडलेला प्रकार पुणे अग्निशमन दलाचे जवान योगेश चव्हाण यांनी पाहिला आणि त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता कर्तव्य बजावत आग विझवून बसमधील सर्व प्रवाशांचे प्राण वाचवले. यामुळे या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

नेमके काय घडले?

जुन्या कात्रजच्या बोगद्याजवळ पुणे – महाबळेश्वर या एसटी बसच्या केबिनला अचानक आग लागली. त्याचदरम्यान कोथरुड अग्निशमन केंद्रात रात्रपाळीची ड्युटी करुन अग्निशमन दलाचे जवान योगेश चव्हाण साताऱ्याला आपल्या घरी निघाले होते. त्याच दरम्यान त्यांनी एसटीला आग लागलेली पाहिली. चव्हाण यांनी तातडीने आपल्या अग्निशमन दलाची मदत मागवली आणि त्यांनी आग विझवण्यास सुरुवात केली. आग विझवण्यासाठी त्यांनी एसटीवर वाळूचा मारा करत आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र आग आटोक्यात न आल्याने चव्हाण यांनी त्या मार्गाने जाणारी एक चारचाकी गाडी थांबवून त्यांनी त्या गाडीतील फायर एक्स्टिंग्विशर वापरुन संपूर्ण आग विझवली. चव्हाण यांनी विझवलेल्या आगीमुळे प्रवाशांसह एसटी चालक यांनी सुटकेचा श्वास घेतला. मात्र आगीचे कारण अद्याप कळले नसल्याचे समोर आले आहे.

- Advertisement -

वाचा – पुण्यात पीएमपीएमएल बस ला लागली आग;पाच दिवसातील दुसरी घटना

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -