घरCORONA UPDATEदौंडचे भाजप आमदार राहुल कुल यांना कोरोनाचा संसर्ग

दौंडचे भाजप आमदार राहुल कुल यांना कोरोनाचा संसर्ग

Subscribe

पुण्यातील दौंड मतदारसंघाचे भाजपचे आमदार राहुल कुल यांना देखील कोरोनाचा संसर्ग झाला असल्याची माहिती समोर येत आहे. आमदार राहुल कुल यांनी स्वतः फेसबुकवर पोस्ट टाकत याची माहिती दिली आहे. राहुल कुल आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हणाले की, “डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मी कोरोना टेस्ट करुन घेतली. सुदैवाने माझ्या कुटुंबातील सदस्य, सहकारी यांची टेस्ट निगेटिव्ह आलेली आहे. माझी प्रकृती स्थिर असून योग्य उपचार सुरु आहेत, तेव्हा काळजी नसावी.”

“संचारबंदी दरम्यान स्थानिक प्रशासनाशी समनव्य, कोरोना संदर्भात विविध उपाययोजनांसाठी बैठका व नागरिकांच्या समस्यांचे निराकरण करताना अनेकांशी संपर्क येत होता. जरी योग्य ती काळजी घेत असलो तरिही कोरोना संक्रमणाचा धोका होताच. परंतु दौंड तालुक्याचा लोकप्रतिनिधी म्हणून माझे कर्तव्य पार पाडताना, लोकांच्या समस्या सोडविताना हे क्रमप्राप्त होते.”, असेही कुल यांनी फेसबुक पोस्टमध्ये लिहिले आहे.

- Advertisement -

पुणे शहर आणि जिल्ह्यात सध्या कोरोनाचा फैलाव वाढत आहे. दोन दिवसांपूर्वीच पुणे महानगरपालिकेचे महापौर मुरलीधर मोहोळ यांच्यासहीत त्यांच्या कुटुंबातील आठ सदस्यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे समोर आले होते. तसेच भोसरीचे भाजपचे आमदार महेश लांडगे, माजी आमदार योगेश टिळेकर देखील कोरोना पॉझिटिव्ह आढळले होते.

 

- Advertisement -

एकमेकांच्या साथीने आपल्याला लढायचंय… कोरोनाला हरवायचंय..

Posted by Rahul Subhash Kool on Tuesday, July 7, 2020

 

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -