घरमहाराष्ट्रपुण्यामध्ये हिंसाचारप्रकरणी अटकेत असलेल्या १७० जणांची सुटका

पुण्यामध्ये हिंसाचारप्रकरणी अटकेत असलेल्या १७० जणांची सुटका

Subscribe

पुण्यामध्ये ९ ऑगस्टला पुकारलेल्या महाराष्ट्र बंद आंदोलनाला हिंसक वळण आले होते. या आंदोलना दरम्यान संतप्त आंदोलकांनी पुणे जिल्हाधिकारी कार्यालय, हॉटेलची तोडफोड केली होती. तसंच पोलिसांवर दगडफेक केली होती. या आंदोलना दरम्यान हिंसाचार करणाऱ्यांना अटक करण्यात आली होती. आज त्यांची जामीनावर सुटका करण्यात आली आहे.

पुण्यामध्ये मराठा आंदोलना दरम्यान हिंसचार केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या १७० जणांची जामिनावर सुटका करण्यात आली आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीवरुन ९ ऑगस्टला राज्यभर बंदची हाक देण्यात आली होती. या बंदला पुणे आणि औरंगाबादमध्ये हिंसक वळण आले. संतप्त झालेल्या आंदोलकांनी पुण्यामध्ये तोडफोड, जाळपोळ आणि पोलिसांवर दगडफेक केली होती. याप्रकरणी त्यांना अटक करण्यात आले होते.

- Advertisement -

आंदोलना दरम्यान केला होता हिंसाचार

पुण्यामध्ये आंदोलना दरम्यान संतप्त झालेल्या आंदोलकांनी जिल्हाधिकारी कार्यलय, चांदणी चौक, कोथरुड, वारजे आणि हिंजवडी येथे हिंसाचार केला होता. आंदोलकांनी गाड्यांची, हॉटेलची तोडफोड केली होती. त्यानंतर त्यांनी मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे आणि पुणे – बंगळुरु हायवे रोकला होता. त्यानंतर त्यांनी पोलिसांवर देखील दगडफेक केली होती. या आंदोलनानंतर पोलिसांनी हिंसाचार करणाऱ्या आंदोलकांची धरपकड सुरु होती.

१५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर सुटका

हिंसाचार करणाऱ्या १९४ जणांना पोलिसांनी अटक केली होती. त्यापैकी ३१ जणांची त्याच दिवशी सुटका करण्यात आली होती. त्यानंतर उरलेल्या आंदोलकांना येरवडा जेलमध्ये पाठवण्यात आले होते. आज या आंदोलकांची जामिनावर सुटका करण्यात आली आहे. १५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर या सर्वांची सुटका करण्यात आली आहे.

- Advertisement -

संबंधित बातम्या – 

पुण्यात मराठा आंदोलन पेटले

हिंसाचार करणाऱ्या आंदोलकांना पोलिसांनी घेतलं ताब्यात

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -