घरमहाराष्ट्रपुणेघराणेशाही असली तरी...; विरोधकांकडून होणाऱ्या घराणेशाहीच्या आरोपांवर सुप्रिया सुळे स्पष्ट बोलल्या

घराणेशाही असली तरी…; विरोधकांकडून होणाऱ्या घराणेशाहीच्या आरोपांवर सुप्रिया सुळे स्पष्ट बोलल्या

Subscribe

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (NCP) कार्यकारी अध्यक्षपदी सुप्रिया सुळे (Supriya Sule) पुणे दौऱ्यावर आहेत. त्यांनी नागरिकांच्या, कलाकारांच्या, उद्योगपतींच्या, भेटीगाठीला सुरुवात केली आहे. यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना विरोधकांकडून होत असलेल्या घराणेशाहीच्या आरोपावर भाष्य केले. (Although dynastic…; Supriya Sule spoke clearly on the allegations of nepotism by the opposition

सुप्रिया सुळे म्हणाल्या की, घराणेशाही असली तरी मला मी शरद पवार आणि प्रतिभा पवार यांची मुलगी असल्याचा मला सार्थ अभिमान आहे. घराणेशाहीची टीका कऱणाऱ्यांच्या पक्षातील घराणेशाहीची यादी मी अनेकदा संसदेत वाचून दाखवली आहे. त्यामुळे माझ्याकडे बोट दाखवताना चार बोटे तुमच्याकडेही आहेत हे लक्षात ठेवा, असा सडेतोड उत्तर त्यांनी विरोधकांना दिले.

- Advertisement -

मी आणि प्रफूल्ल पटेल शरद पवार यांना रिपोर्ट करणार
सुप्रिया सुळे म्हणाल्या की, मी शरद पवार यांची मुलगी असल्यामुळे मला उत्कृष्ठ संसदपटूचा पुरस्कार मिळत नाही, त्यासाठी माझे कामही महत्वाचे आहे. यावेळी त्यांनी नव्या जबाबदारीबद्दल सांगताना मी आणि प्रफूल्ल पटेल शरद पवार यांना रिपोर्ट करणार आहोत, तर राज्यात मी अजित दादा, छगन भुजबळ, जयंत पाटील यांना रिपोर्ट करणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

विशिष्ट रिपोर्टिंग सिस्टम असायला हे टीव्हीचं चॅनल नाही
सुप्रिया सुळे म्हणाल्या की, मी महाराष्ट्राची प्रभारी आहे म्हणजे ही काही दडपशाही नाही. हा लोकशाही मानणारा पक्ष आहे. विशिष्ट रिपोर्टिंग सिस्टम असायला हे टीव्हीचं चॅनल नाही. हा पक्ष आहे. आम्ही सेवा करायला आलो आहोत. त्यामुळे रिपोर्टिंगचा प्रश्न येतो कुठे? अर्थातच जबाबादारी सर्वांवर असेल. प्रत्येकजण पक्ष कसा वाढवायचं हे काम करणार आहोत, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.

- Advertisement -

दरम्यान, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचा (NCP) शनिवारी (10 जून) 25 वा वर्धापनदिन पार पडला. यावेळी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी मोठी घोषणा करताना राष्ट्रवादी पक्षाच्या कार्यकारी अध्यक्षपदी सुप्रिया सुळे आणि प्रफूल्ल पटेल यांची निवड केली. या निवडीनंतर विरोधकांनी घराणेशाहीचा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेसवर जोरदार टीका केली गेली. या टिकेला आता सुप्रिया सुळे यांनी उत्तर दिले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -