घरक्राइमNavi Mumbai : औरंगजेबाचा फोटो पुन्हा मोबाईल स्टेटसवर; सकल हिंदू समाज आक्रमक

Navi Mumbai : औरंगजेबाचा फोटो पुन्हा मोबाईल स्टेटसवर; सकल हिंदू समाज आक्रमक

Subscribe

मागील काही दिवसांपासून राज्यातील अनेक शहरामध्ये औरंगजेबाचे उदात्तीकरण करणारे स्टेटस सोशल मीडियावर ठेवले जात आहेत. या स्टेटसमुळे शांतता भंग झाल्याच्या घटनाही घडत आहेत. औरंगजेबाच्या फोटोच्या पार्श्वभूमीवर अहमदनगर, छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूर या ठिकाणी धार्मिक दंगली झाल्या. या दंगलींवर पोलिसांनी नियंत्रण मिळवलं. पण पुन्हा एकदा औरंगजेबाचा फोटो स्टेटसवर ठेवल्याची घटना नवी मुंबईत घडली आहे. मात्र, हा प्रकार समोर येताच धार्मिक तेढ निर्माण होऊ नये म्हणून पोलिसांनी शांततेचे आवाहन केले आहे. (navi mumbai vashi police detained one youth for put photo of aurangazeb on status)

नवी मुंबई (navi mumbai) शहर हे धार्मिक दंगलीसाठी प्रसिद्ध नसून औरंगजेबाजाच्या (aurangazeb) मुद्दावरून नवी मुंबई मध्ये धार्मिक तेढ निर्माण होऊ नये म्हणून पोलिसांनी शांततेचं आवाहन केलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मोहम्मद हनिफ असे त्याचे नाव आहे. मोबाईल सेवा देणाऱ्या एका दुकानात काम करणाऱ्या २९ ते ३० वर्षीय मोहम्मद हनिफ औरंगजेबाचा फोटो असलेले स्टेटस (Status) ठेवले होते. हे लक्षात येताच त्याच्या विरोधात वाशी पोलीस ठाण्यात विश्व हिंदू परिषद, शिव शंभो प्रतिष्ठान, तसेच हिंदू सकळ समाज संघटना तसेच भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते संध्याकाळी ७ वाजल्या पासून जमा होऊ लागले. त्यात या युवकाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याची चौकशी सुरु केली जात आहे.

- Advertisement -

हेही वाचा – राजकारणासाठी ‘औरंगजेब’ लागणे हे कथित हिंदुत्वाचं दुर्दैव; कोल्हापूर प्रकरणी राऊतांचा सरकारवर हल्लाबोल

सुरुवातीला ही बाब लक्षात आल्या नंतर हिंदू संघटनांनी त्याच्या मोबाईल क्रमांकावरून त्याचा शोध घेतला आणि त्याला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिल्याचा दावा केला जात आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका युवकाची चौकशी सुरु असून सध्या पोलीस ठाण्यात त्याला आणण्यात आले आहे. चौकशी नंतर त्याच्यावर कायद्यानुसार योग्य ती कारवाई केली जाईल.

- Advertisement -

हेही वाचा – त्या घटनेनंतर या देवीच्या मंदिरात नतमस्तक होऊन औरंगजेबने मागितली होती माफी

औरंगजेबाचा फोटो स्टेटस ठेवून नवी मुंबईमधील धार्मिक गटांमध्ये तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न करून सार्वजनिक शांतता बिघडवणे संभवनीय आहे त्यामुळे मोहम्मद अली मोहम्मद हुसेन या २९ ते ३० वर्षीय व्यक्तीच्या विरोधात वाशी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास करत आहेत. दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणी सर्व समाजाच्या नागरिकांना शांतता बाळगवण्याचं आवाहन केलं आहे. नवी मुंबईतील परिस्थिती बिघडू नये यासाठी पोलिसांकडून प्रयत्न केले जात आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -