घरमहाराष्ट्रपुणेफुफ्फुस घेऊन निघालेल्या रुग्णवाहिकेचा पुण्यात अपघात, डॉक्टरही स्वत: जखमी; मात्र रुग्णाचे वाचले...

फुफ्फुस घेऊन निघालेल्या रुग्णवाहिकेचा पुण्यात अपघात, डॉक्टरही स्वत: जखमी; मात्र रुग्णाचे वाचले प्राण

Subscribe

पुणे : प्रत्यारोपणासाठी पुण्याहून फुफ्फुस घेऊन चेन्नईसाठी निघालेल्या रुग्णवाहिकेचा टायर फुटून अपघात झाला. या अपघातात प्रत्यारोपण करणारे डॉक्टरही जखमी झाले. मात्र एका व्यक्तीला जीवदान द्यायचं असल्यानं जखमी डॉक्टरांनी प्रसंगावधान दाखवले आणि चेन्नई गाठून रुग्णावर यशस्वी शस्त्रक्रिया केली. दोन तास उशीर झाला, पण रुग्ण बरा असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. (Ambulance carrying lung accident in Pune doctor himself injured But the patient survived)

मुंबईतील कार्डिओथोरॅसिक सर्जन फुफ्फुस प्रत्यारोपणासाठी चेन्नईला जाणार होते. सर्जन डॉ. संजीव जाधव हे हृदय व फुफ्फुसाचे सर्जन आणि मुंबईतील अपोलो हॉस्पिटल मुख्य हृदय शल्यचिकित्सक आहेत. ते आपल्या टीमसह पिंपरीतील डीवाय पाटील रुग्णालयात 19 वर्षीय ब्रेन डेड तरुणाचे फुफ्फुस काढण्यासाठी पोहोचले होते. आपत्कालीन गरज असल्याने होती, पोलिसांनी पिंपरीतील डीवाय पाटील रुग्णालय ते पुण्यातील लोहेगाव विमानतळापर्यंत ग्रीन कॉरिडॉर तयार करण्याकरता वेळ मिळाली नाही.

- Advertisement -

हेही वाचा – Maharashtra Sadan Scam : …त्यामुळेच छगन भुजबळ तुरुंगात गेले; मनोज जरांगेंची पुन्हा टीका

डॉ. संजीव जाधव आणि त्यांची टीम पुणे विमानतळाच्या दिशेने रवाना झाली. डॉ. संजीव जाधव हे स्वतः रुग्णवाहिकेत पुढं बसलेले होते. मात्र हॅरीस ब्रिजजवळ सायंकाळी पाचच्या सुमारास रुग्णवाहिकेचा टायर फुटला आणि चालकाचा रुग्णवाहिकेवरील ताबा सुटला. रुग्णवाहिका दोन-तीन वाहनांना धडकली आणि शेवटी डिव्हायडरमध्ये जाऊन अडकली. धक्कादायक म्हणजे रुग्णवाहिका आणखी पुढे गेली असती तर नदीत कोसळली असती.

- Advertisement -

या अपघातात डॉ. संजीव जाधव, ज्युनिअर डॉक्टर आणि दोन टेक्निशियन जखमी झाले. मात्र एका व्यक्तीला जीवदान द्यायचं असल्यानं जखमी डॉक्टरांनी प्रसंगावधान दाखवले. दुसऱ्या रुग्णवाहिकेची वाट न पाहता खासगी वाहन बोलावलं आणि त्यात फुफ्फुस घेऊन ते पुणे विमानतळाच्या दिशेने गेले. तिथून विमानाने ते चेन्नईला पोहचले. संध्याकाळी साडेसहा वाजता शस्त्रक्रियेसाठी पोहण्याचे उद्दिष्ट होते, मात्र अपघातामुळे डॉक्टर रात्री साडेआठ वाजता पोहचले. डॉक्टरांनी जखमी अवस्थेत रुग्णावर यशस्वी शस्त्रक्रिया केली.

हेही वाचा – ST Bus : दिवाळीत एसटीची विक्रमी कमाई; एका दिवसात 75 वर्षांच्या इतिहासातील सर्वाधिक उत्पन्न

डॉ. संजीव जाधव यांनी सांगितले की, ज्या रुग्णावर शस्त्रक्रिया करण्यात आली, तो 72 दिवस लाइफ सपोर्टवर होता. त्याला फुफ्फुसाचा कर्करोग झाला होता. शस्त्रक्रियेनंतर रुग्ण वेगाने बरा होत आहे. रुग्णाच्या नातेवाईकांनी डॉक्टरांचे आभार मानले असून अपघात झाल्यानंतर रुग्णाचा जीव वाचविल्यामुळे डॉक्टरांचे सर्वत्र कौतुक होताना दिसत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -