घरमहाराष्ट्रपुणेबारामती लोकसभेचे कधी ऑपरेशन होईल ते पवारांना कळणार नाही, गोपीचंद पडळकरांचा टोला

बारामती लोकसभेचे कधी ऑपरेशन होईल ते पवारांना कळणार नाही, गोपीचंद पडळकरांचा टोला

Subscribe

पुणे – 2024 ला पवारांचे विसर्जन करण्यासाठी चंद्रशेखर बावनकुळे बारामतीत आले आहेत. श्रीलंकेतील नेते पळून गेले तसे शरद पवारांना पळून जावे लागणार, असा हल्लाबोल भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी केला. भाजपच्या मिशन बारामतीच्या निमित्ताने आयोजित भाजपच्या मेळाव्यात पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर जरोदार टीका केली.

यावेळी गोपींचद पडळकर यांनी एखाद्याला फसवून घ्यायचे लुबाडून घेण्यात बारामतीकरांना फार आनंद असतो. जेव्हा महाविकास आघाडीचे सरकार आले तेव्हा सुप्रिया सुळे वरमाई सारख्या फिरत होत्या. निर्मला सीतारामन या बिनटाक्याचे ऑपरेशन करणाऱ्या डॉक्टर आहेत. बारामती लोकसभेचे कधी ऑपरेशन होईल ते पवारांना कळणार देखील नसल्याचे ते म्हणाले.

- Advertisement -

बारामती बालेकिल्ला नसून टेकडी –

बारामती बालेकिल्ला नसून शरद पवारांची टेकडी असल्याचे वक्तव्य गोपीचंद पडळकर यांनी केले. मी 2 वर्ष ही टेकडी ठोकून काढत आहे. पवारांचे राजकारण पोलिसांवर चालते. माझ्यावर खूप केसेस आहेत. या केसेस म्हणजे अंगावारील दागिना समजा असे पडळकर म्हणाले. अजित पवारांनी बंड केले तेव्हा दोन तृतीयांश आमदार त्यांच्या मागे राहिले नाहीत. एकनाथ शिंदे 50 आमदार घेऊन गेले. फडणवीसांना सत्तेत बसून द्यायचे नव्हते. मात्र, ते सत्तेत आले, हे शरद पवारांचे दु:ख असल्याचे पडळकर म्हणाले.

- Advertisement -

महाविकास प्रश्न सोडवले नाहीत –

महाविकास आघाडीच्या काळात शेतकऱ्यांची वीज तोडण्यात आली होती. जेव्हा चंद्रशेखर बावनकुळे राज्याचे ऊर्जामंत्री होते, तेव्हा एकाही शेतकऱ्याची वीज जोडणी तोडण्यात आली नाही, असे पडळकर म्हणाले. मराठा आरक्षण महाविकास आघाडी सरकारला देता आले नाही. ओबीसी आरक्षण फडणवीस सत्तेत आले की परत मिळवले असल्याचे त्यांनी सांगितले.

हे भाजपचे यश –

पाकिस्तानची मॅच जिंकल्यावर हात वरून शरद पवार यांनी आनंद व्यक्त केला. आज त्यांना आरती करताना व्हिडिओ टाकावे लागत आहेत. हे भाजपचे यश असल्याचे गोपीचंद पडळकरांनी म्हटले आहे. आजच्या मेळाव्यातील उत्साह बघितला तर पवार अस्वस्थ होतील, असेही पडळकर म्हणाले.

Ajinkya Desai
Ajinkya Desaihttps://www.mymahanagar.com/author/ajinkyadesai/
मागील 4 वर्षापासून डिजिटल मिडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -