घरताज्या घडामोडीअमित शाहांच्या मुंबई दौऱ्यानंतर उद्धव ठाकरेंनी बोलावली विभागप्रमुखांची बैठक

अमित शाहांच्या मुंबई दौऱ्यानंतर उद्धव ठाकरेंनी बोलावली विभागप्रमुखांची बैठक

Subscribe

केंद्रीय मंत्री अमित शाहांच्या मुंबई दौऱ्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे सक्रिय झाले आहेत. शिवसेनेने उद्या ७ ऑगस्ट रोजी विभागप्रमुख आणि महिला संघटकांची बैठक बोलावली आहे. मातोश्री या निवासस्थानी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडणार आहे.

आगामी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी शिवसेना खऱ्या अर्थाने मैदानात उतरली आहे. संभाजी ब्रिगेड आणि मराठा सेवा संघ या दोन्ही पक्षांनी शिवसेनेला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे शिवसेना, संभाजी ब्रिगेड आणि मराठा सेवा संघ ही तिन्ही पक्ष आपल्याला निवडणुकीच्या रिंगणात दिसणार आहेत. त्यामुळे ठाकरेंनी बोलावलेल्या बैठकीत ते कोणती भूमिका घेणार, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

- Advertisement -

मुंबईतल्या राजकारणावर फक्त भाजपाचे वर्चस्व असावे. मुंबई महापालिकेत पुढचा महापौर भाजपाचा होणार, असे वक्तव्य करून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आगामी मुंबई महापालिकेच्या निवडणुकांचे रणशिंग फुंकले. मात्र, अमित शाहांच्या या वक्तव्यामुळे भाजपासोबत युती केलेल्या शिंदे गटाच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेत शिंदे गटाचे वर्चस्व टिकणार का, याकडे सर्वांचं लक्ष आहे.

2014 मध्ये केवळ दोन जागांसाठी शिवसेनेने युती तोडली होती असा गौप्यस्फोट शाह यांनी केला. भाजपने कधीच छोटा भाऊ-मोठा भाऊ म्हटले नाही. शिवसेनेनेच युती तोडली असल्याचे सांगत शिवसेनेने आमच्या जागा पाडून आमच्या पाठीत खंजीर खुपसला, असे अमित शाह म्हणाले.

- Advertisement -

हेही वाचा : अनंत चतुर्दशीला विशेष लोकलच्या सेवेची व्यवस्था करावी; जयंत पाटलांची मागणी


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -