घरमहाराष्ट्रपुणेNavale Bridge Accident : पुण्यातील नवले पुलावर ट्रकचा भीषण अपघात; चोघांचा जागीच...

Navale Bridge Accident : पुण्यातील नवले पुलावर ट्रकचा भीषण अपघात; चोघांचा जागीच मृत्यू

Subscribe

पुणे : पुण्यातील नवले पुलाजवळ गेल्या काही दिवसांपासून अपघाताचे सत्र सुरूच आहे. आज (16 ऑक्टोबर) रात्री 8 च्या सुमारास दोन ट्रकचा भीषण अपघात झाला. यानंतर ट्रकने पेट घेतल्यामुळे चौघांचा होरपळून मृत्यू झाला आहे तर, दोन जण जखमी आहेत. या दोन्ही ट्रकला लागलेली आग विझवण्यात अग्नीशमन दलाला यश आलं आहे. हा ट्रक साताऱ्याहून पुण्याच्या दिशेने प्रवास करत होता.

हेही वाचा – पुण्यातील भिडे वाड्यासंदर्भातील याचिका हायकोर्टाने फेटाळली; 13 वर्षांनंतर भुजबळ यांच्या लढ्याला यश

- Advertisement -

पुणे-बेंगलोर महामार्गावरील बाह्यवळण मार्गावरुन रात्री आठच्या सुमारास ट्रक निघाला होता. मात्र नवले पूल येथील स्वामी नारायण मंदिर परिसरात दोन ट्रकची एकमेकांना जोरदार धडक बसली. त्यानंतर एका ट्रकने पेट घेतला. त्या ट्रकमधील केबिनमध्ये बसून प्रवास करणारी एक महिला, तिची मुलगी आणि ट्रकचा क्लिनर आणि एका पुरुषाचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. आगीत मृत्यूमुखी पडलेले सर्वजण एकाच कुटुंबातील असण्याची शक्यता आहे.

- Advertisement -

या घटनेची माहिती अग्निशमन दलाच्या 4 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. ट्रकने पेट घेतल्यानंतर जवानांनी पाण्याचा मारा करून आग आटोक्यात आणली. ट्रकच्या केबीनमध्ये अडकलेल्या तिघांना बाहेर काढण्यात आले. मात्र, त्यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. ट्रकने पेट घेतल्यानंतर वाहतूक विस्कळीत झाली. पोलिसांनी घटनास्थळी क्रेन मागवत ट्रक बाजूला काढल्यानंतर वाहतूक सुरळीत झाली आहे. परंतु नवले पूल हा किती धोकादायक आहे हे या घटनेवरून पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे.

हेही वाचा – अजित पवार गटाला मीरा बोरवणकरांचे थेट आव्हान, म्हणाल्या – ‘अब्रूनुकसानीचा दावा करावा.’

पुण्यातील नवले पूलावर आतापर्यंत अनेक जीवघेणे अपघात झाले असून त्यामध्ये अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. या पुलावर वारंवार घडणाऱ्या अपघातांच्या मालिकेमुळे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या विरोधात नागरिक संतप्त झालेले पाहायला मिळत आहेत. याबाबत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या वतीने ठोस उपाययोजना करण्याची मागणी स्थानिकांकडून होते आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -