घरताज्या घडामोडीPune : वाहतूक कोंडीने पुणेकर हैराण, भरपावसात रस्त्यावर उतरून केलं आंदोलन

Pune : वाहतूक कोंडीने पुणेकर हैराण, भरपावसात रस्त्यावर उतरून केलं आंदोलन

Subscribe

वाहतूक कोंडीने पुणेकर त्रस्त झाले असून भरपावसात काही नागरिकांनी रस्त्यावर उतरून आंदोलन केलं. वाहतूक कोंडी हा पुणेकरांच्या पुणेकरांच्या नित्याचाच विषय झाला आहे. वाहतूक कोंडीमुळे मुंढवा केशवनगरवासियांचे जगणे असह्य झाले आहे. त्यामुळे केशवनगरचे माजी उपसरपंच आणि भाजप नेते संदीप लोणकर यांच्या नेतृत्वात रविवारी महात्मा फुले चौक मुंढवा येथे मार्चा आणि आंदोलन करण्यात आले.

पुणेकर रस्त्यावर उतरले असून त्यांच्या हातात जाहीर निषेधाचे पोस्टर्स आहेत. महात्मा फुले चौकात भुयारी मार्ग, अथवा उड्डाणपूल झालाच पाहिजे, अशी मागणी त्रस्त झालेल्या नागरिकांनी केली आहे. तसेच केशवनगर मुंढवा वासियांच्या गळ्याला वसलेला वाहतूक कोंडीचा फास कधी सुटणार? असा प्रश्न देखील नागरिकांनी उपस्थित केला आहे.

- Advertisement -

मुंढवा चौकात भूयारी मार्ग अथवा उड्डाणपूल करा, बाधित नागरिकांना भरपाई देऊन रस्ते रुंद करा नाहीतर मनपा आयुक्तालयात हजारो नागरिकांना घेऊन घुसू असा इशारा संदीप लोणकर यांनी दिला आहे. या आंदोलनात माजी आमदार योगेश टिळेकर, भाजप अध्यक्ष संदीप दळवी, महिला आघाडी अध्यक्षा स्वाती कुरणे, भाजप नेते गणेश घुले, प्रशांत भंडारी, कुलदीप कोद्रे, अशोक येवले यांच्यासह अनेक युवकांनी देखील यामध्ये सहभाग घेतला होता.

दरम्यान, या नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी तातडीने सुरू करण्याबाबत मनपा आयुक्त यांच्याबरोबर तातडीने बैठक घेणार आहे, याबाबत पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचीही भेट घेणार असल्याचे यावेळी माजी आमदार योगेश टिळेकर यांनी सांगितले.

- Advertisement -

हेही वाचा : 97 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी रवींद्र शोभणे


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -