घरताज्या घडामोडीCoronavirus: प्लॅटफॉर्म तिकीट महागले!

Coronavirus: प्लॅटफॉर्म तिकीट महागले!

Subscribe

मुंबई, पुणे, भुसावळ आणि सोलापूरमध्ये नियम लागू करण्यात आला आहे.

करोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारने अनावश्यक गर्दी टाळा असे आवाहन केले होते. मात्र, मोठ्या प्रमाणात नागरिक राज्य सरकारच्या सुचनांकडे दुर्लक्ष करत प्रवास करत आहेत. मोठ्या प्रमाणात रेल्वे स्थानकांवर गर्दी असते. याच पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेने मोठा निर्णय घेतला आहे. प्लॅटफॉर्मवरील गर्दी कमी करण्यासाठी प्लॅटफॉर्म टिकीट १० वरुन ५० रुपये केले आहे. मुंबई, पुणे, भुसावळ आणि सोलापूरमध्ये नियम लागू करण्यात आला आहे.

platform rates
प्लॅटफॉर्म टिकीट महागले

हेही वाचा – ‘व्हेंटिलेटर खरेदीसाठी आमदार निधीतून 10 लाख रुपये देणार’

- Advertisement -

वर्क फ्रॉम होम होणार?

करोनाचा वाढता प्रदुर्भाव राज्य सरकारसाठी मोठे आव्हान बनले आहे. करोना व्हायरस आटोक्यात आणण्यासाठी राज्य सरकार कसोशीने प्रयत्न करत आहे. सध्या महाराष्ट्रात करोनाची संख्या ३९ वर पोहचली आहे. दरम्यान, गर्दीच्या शहरांमध्ये करोनाचा संसर्ग वाढण्याची शक्यता असल्यामुळे राज्य सरकारने मुंबई, पुण्यासारख्या शहरांवर लक्ष केंद्रीत केले आहे. नागरिक कामासाठी घराबाहेर पडत असल्यामुळे गर्दी होत आहे. ही गर्दी टाळण्यासाठी वर्क फ्रॉम होमवर चर्चा सुरु झाली. याबाबत राज्य सरकार आणि खासगी कंपन्यांमध्ये चर्चा झाली. लार्सन अँड टुब्रो, रिलायन्स इंडस्ट्रीज, औषध आणि मनोरंजन क्षेत्रातील कंपन्यांसह २५ कंपन्यांचे प्रमुख अधिकारी या बैठकीला उपस्थित होते.

राज्य सरकारकडून जास्तीत जास्त कर्मचाऱ्यांना घरातून काम करण्याची परवानी द्या, असा प्रस्ताव कंपन्यांसमोर ठेवण्यात आला. यावेळी अनेक कंपन्यांनी वर्क फ्रॉम होमच्या प्रस्तावाला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -