घरताज्या घडामोडीकरोनामुळे पद्मश्री राहीबाईंची बीज बँकही राहणार बंद

करोनामुळे पद्मश्री राहीबाईंची बीज बँकही राहणार बंद

Subscribe

बीजमता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पद्मश्री राहीबाई पोपेरे यांनीदेखील काही दिवस आपली बीज बँक विद्यार्थी, शेतकरी आणि अभ्यासकांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारने राहीबाईंचा पद्मश्रीने गौरव केल्यानंतर त्यांची बीजबॅक पाहण्यासाठई राज्याच्या कानाकोपऱ्यातून लोक येत आहे. मात्र पुढील काही दिवस ही बीज बँक बंद राहणार असल्याचे सांगण्यात आले.

जगभर आणि देशात थैमान घातलेल्या करोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे सर्वत्र काळजी घेतली जात असताना शासनाच्या आदेशाचे पालन आणि गर्दी टाळण्यासाठी बीजमाता राहीबाई पोपेरे यांनीही पुढाकार घेतला आहे. शासनाचे पुढील आदेश प्राप्त होईपर्यंत त्यांची कोंभाळणे येथील गावरान बियांची बँक अभ्यासक, शेतकरी, विद्यार्थी या सर्वांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. देशात करोनाचे रुग्ण वाढत असतांना सर्वानी खबरदारी घेतली पाहिजे, म्हणून हे पाऊल उचलण्यात आले आहे.

- Advertisement -

गावरान बियाणे बहुतेक भागातून हद्दपार झाल्यामुळे मोठा ओघ कोंभाळणे बीजबँकेकडे येत आहे. देश आणि राज्याच्या कानाकोपऱ्यातून लोक बीजबँक पाहण्यासाठी आणि बियाणे खरेदी करण्यासही येत असतात. राहीबाईंना भारत सरकारचा पद्मश्री ‘किताब जाहीर झाल्यापासून त्यांना भेटायला येणाऱ्यांची संख्यादेखील मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यात कृषी महाविद्यालये, कृषी संशोधन केंद्र, कृषीचे अभ्यासक, शेतकरी यांचा मोठा सहभाग आहे. कोंभाळणे हे दूर आदिवासी भागात वसलेले गाव असल्याने येथे पुरेशा वैद्यकीय सेवा उपलब्ध नाहीत, त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून ही बीज बँक बंद ठेवण्यात येत असल्याची माहिती बायफचे विभागीय अधिकारी जितीन साठे यांनी दिली आहे.

ज्या शेतकऱ्यांना बियाणे हवे आहे, त्यांनी फोनवर संपर्क करावा त्यांना कुरियनने बियाणे पाठवले जाईल. मात्र त्यासाठी बीजबँकेत येण्याची आवश्यकता नाही. करोनाचा सामना करतांना येथे येण्याचे टाळावे असे आवाहन बीजमाता राहीबाई पोपेरे यांनी केले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -