घरमहाराष्ट्रSharad Pawar : अजित पवारांना...; शरद पवार यांनी सांगितलं भेटीमागचं कारण

Sharad Pawar : अजित पवारांना…; शरद पवार यांनी सांगितलं भेटीमागचं कारण

Subscribe

Sharad Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) या काका पुतण्यांची पुण्यातील (Pune) एका बड्या उद्योगपतीच्या बंगल्यावर भेट झाल्याची माहिती पुन्हा एकदा समोर आली. अजित पवार यांनी बंडखोरी करत भाजपसोबत (BJP) गेल्यानंतर चौथ्यांदा भेट घेतली आहे. या भेटीत कोणत्या विषयावर चर्चा झाली हे मात्र गुलदस्त्यात आहे. परंतु या दोघांच्या भेटीवर राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया येत आहेत. अशातच शरद पवार यांनी मोठे विधान केले आहे. अजित पवारांना वडिलकीच्या नात्याने भेटलो, असे विधान त्यांनी केले आहे. ते सोलापूरमध्ये पत्रकारांशी बोलत होते. (To Ajit Pawar Sharad Pawar told the reason behind the meeting)

उद्याेगपतीच्या घरी झालेल्या भेटीवर बोलताना शरद पवार म्‍हणाले की, अजित पवार हा माझा पुतण्या आहे. त्यामुळे कुटुंबातील व्यक्तीनं वडिलमाणसाला भेटण्यात काही गैर नाही. अजित पवार आणि माझी गुप्त बैठक झालेली नाही, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

- Advertisement -

हेही वाचा – जागरूकपणानं भूमिका घ्यायचं काम गणपतरावरावांनी अखंडपणानं केलं – शरद पवार

भाजपासाेबत न जाण्याचा पुनरुच्चार

शरद पवार आणि अजित पवार यांची वारंवार भेट होत असल्यामुळे ते भाजपात अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. यावर बोलताना शरद पवार म्हणाले की, राष्ट्रवादीचा अध्यक्ष म्हणून मी माझी स्पष्ट भूमिका मांडतो की, आम्ही भाजपसोबत जाणार नाही, असा पुनरुच्‍चार त्यांनी केला. तसेच लोकांमध्ये आम्हाला चांगला प्रतिसाद मिळतो आहे, असेही त्यांनी सांगितले.

- Advertisement -

हेही वाचा – तुम्ही गुपचूप भेटा, प्रेमाने भेटा…; शरद पवार-अजित पवार भेटीवर अमृता फडणवीसांचं विधान

भाजपाकडून सत्तेचा गैरवापर

भाजपाकडून सत्तेचा गैरवापर केला जात आहे, असा आरोप करताना शरद पवार म्हणाले की, माझ्यामते सामान्य लोकांना हे मान्य नाही. त्यामुळे जेव्हा मत देण्याची वेळ येईल, त्यावेळी सामन्य लोकांकडून त्यांना सहन करण्याची वेळ येईल, असंही शरद पवार म्हणाले. तसेच पुढील रणनितीसाठी मुंबईमध्ये प्राथमिक अंजेडा ठरवण्यासाठी ‘इंडिया’ आघाडीची बैठक होणार आहे. त्यावेळी तीस ते चाळीस नेते आम्ही एकत्र येणार आहोत. तसेच सीमाभागातील प्रश्नांवर गांभीर्याने लक्ष देणं गरजेचं आहे, असेही त्‍यांनी यावेळी नमूद केलं.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -