घरठाणेAwhad Vs Raj Thackeray : राज ठाकरेंनी दुसरीकडे डोकावण्यापेक्षा स्वतःच्या पक्षात लक्ष...

Awhad Vs Raj Thackeray : राज ठाकरेंनी दुसरीकडे डोकावण्यापेक्षा स्वतःच्या पक्षात लक्ष घालावे;आव्हाडांचा सल्ला

Subscribe

ठाणे – मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी दुसऱ्याच्या पक्षात डोकावण्यापेक्षा स्वतःच्या पक्षात लक्ष घालावे. शरद पवारांबरोबर बरोबरी करण्याचा प्रयत्न करु नये, असा सल्ला राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी दिला. (Raj Thackeray is mimicry artists says Jitendra Awhad)

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा आज 18वा वर्धापन दिन नाशिकमध्ये साजरा झाला. यावेळी आयोजित मेळाव्यात राज ठाकरे यांनी शरद पवारांचा राष्ट्रवादी पक्ष हा पक्षच नाही, ती निवडुन येणाऱ्या नेत्यांची मोळी आहे, अशी टिका केली. शरद पवारांच्या पक्षातून फुटून अजित पवार भाजपासोबत जाऊन मिळाले आणि त्यांनी सत्तेत सहभाग घेतला. राष्ट्रवादी पक्ष फुटला वगैरे असे काहीही झालेले नाही, दोघेही आतून मिळालेले आहेत. जनतेला मूर्ख बनवत आहेत, असा आरोप राज ठाकरे यांनी शरद पवारांवर केला.

- Advertisement -

राज ठाकरे यांच्या टिकेचा समाचार आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ठाण्याची पत्रकार परिषदेत घेतला. आव्हाड म्हणाले की, राज ठाकरे हेच स्वतः एक नाटक कंपनी आहेत. ते मिमिक्री आर्टिस्ट आहेत. कोणाचीही नक्कल चांगली करु शकतात. त्यांनी स्वतःचा पक्ष वाढवायचा सोडून दुसऱ्याकडे काय चालू आहे, हे कशाला बघता असा टोला आव्हाडांनी लगावला. राज ठाकरे यांनी आपल्या पक्षापुरते बघावे. आपल्या पक्षापुरते मर्यादेत राहावे, असेही आव्हाड म्हणाले.

भारताची संस्कृती खराब करू नका – आव्हाड

दिल्लीमध्ये नमाज अदा करणाऱ्या मुस्लिमांना लाथा मारुन उठवणाऱ्या पोलिसांचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. पोलिसांच्या या कृतीवर आव्हाडांनी आक्षेप घेतला. ते म्हणाले की, एखादी व्यक्ती त्याच्या देवाची प्रार्थना करत आहे, तेव्हा त्याला लाथा मारून उठवणे ही कुठली संस्कृती आहे. भारतामधील गाव-खेड्यात आजही मशिदीसमोर ढोल-ताशे वाजवले जात नाही. ही आपल्या देशाची संस्कृती आहे. तुम्ही हे विद्वेषाचे विष का पसरवत आहात, भारताची सर्वधर्म समभावाची संस्कृती का खराब करत आहे. ही संस्कृती बिघडवू नका, असे आवाहन त्यांनी या पत्रकार परिषदेत केले.

- Advertisement -

हेही वाचा : Raj Thackeray : मनसेची लोकसभेसंबंधी भूमिका गुलदस्त्यात, राज ठाकरे या तारखेला फोडणार बॉम्ब

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -