घरमहाराष्ट्रराजकारण नासवलं जातंय, मूळ विषयांना हात न घालता मेट्रोसह इतर गोष्टींवर खर्च...

राजकारण नासवलं जातंय, मूळ विषयांना हात न घालता मेट्रोसह इतर गोष्टींवर खर्च होतोय; राज ठाकरेंचं वक्तव्य

Subscribe

आत्ताची महाराष्ट्रातील अवस्था अशी आहे की राजकारण नासवलं जातं आहे. इथे जे लोक मोठे झाले, उद्योजक झाले. हे सगळं जाणीवपूर्वक नासवलं जातं आहे. महाराष्ट्रातले लोक शांत बसले आहेत. लोकांना राजकारणात यावंसं वाटत नाही. आज मुळ विषयांना हात न घालता आपण मेट्रोसह इतर गोष्टींवर खर्च करतोय, असं विधान मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलं आहे.

गुजराती, मारवाडी त्यांच्याकडे काही होत नाही म्हणून महाराष्ट्रात आले

राज्यापालांच्या गुजराती- मुंबईवरील वादग्रस्त वक्तव्यावर राज ठाकरे म्हणाले की, गुजराती, मारवाडी त्यांच्याकडे काही होत नाही म्हणून महाराष्ट्रात आले ना, महाराष्ट्रातील सांस्कृतिक जडण-घडणीमुळे अनेकजण महाराष्ट्रात येऊन मोठे झाले. अमिताभ बच्चन जर महाराष्ट्रात आले नसते आणि अलाहबादमध्ये राहिले असते तर मोठे जात नसते. कित्येक कलाकार महाराष्ट्रात आले आणि मोठे झाले, पण महाराष्ट्रातील आपण मोठे होत नाही, आपल्याला काही करण्याची इच्छा होत नाही केवळं गप्प बसून आहोत.

- Advertisement -

विधानसभेत होणाऱ्या चर्चा तर मलाही ऐकवत नाही

महाराष्ट्रातील स्थितीवर बोलताना राज ठाकरे म्हणाले की, विधानसभेत होणाऱ्या चर्चा तर मलाही ऐकवत नाही. बाहेर आल्यानंतर जे काही बडबड करतात ती तर अजिबात ऐकू वाटत नाही. मग मला प्रश्न पडतो की, महाराष्ट्रातला माझा मराठी गप्प का बसला आहे? का आणि कोणासाठी सहन करतोय? एवढेच आवाहन करण्यासाठी मी पुण्यात आलो. मला जो राग आहे इतर गोष्टींबद्दलचा ती गोष्ट होत का नाही. या राज्याचा सारासार विचार कधी करणार? असा सवाल राज ठाकरेंनी उपस्थित केला.

मूळ विषयांना हात न घालता मेट्रोसह इतर गोष्टींवर खर्च होतोय

राज ठाकरे म्हणाले, बेळगाव – कारावारसह सीमाभागाबद्दल कसेतरी एकमत झाले. एका शहराला लोकसंख्येप्रमाणे पंधरा टक्के रस्ते लागतात. पुण्याच्या लोकसंख्येप्रमाणे आठ ते नऊ टक्के रस्ते आहेत. पुण्यात उद्या हलायला जागा राहणार नाही. आपण मुळ विषयांना हात घालत नाही. आपण मेट्रो, ब्रिज, फ्लायओव्हरसह इतर गोष्टींवर खर्च करतोय. त्याऐवजी दुचाकी, चारचाकींवर बंधने यावीत, जगात ती आली नाही आपल्याकडे कशी येणार, तोच प्रश्न महत्वाचा आहे. मुंबईची देखील तिच अवस्था आहे.

- Advertisement -

परदेशी आणि आपल्याकडील कंपन्यांनी भारताला दुचाकीचं डंम्पिंग ग्राऊंड केलं 

परदेशी कंपन्या आणि आपल्याकडील कंपन्यांनी भारताला दुचाकीचं गोडाऊन नाही तर डंम्पिंग ग्राऊंड करुन ठेवलं आहे. वाहनं वाढतायत मग सार्वजिनक वाहतूकीचा कोण वापर करणार? तर मग आपण हजारो कोटी रुपये का खर्च करतोय. हे साधे प्रश्न आपण आमदार, नगरसेवकांना विचारत नाही, अशी खंतही राज ठाकरेंनी उपस्थित केली.


राजकारणाला रोज फाटे फुटताहेत, प्रवक्त्यांची वक्तव्ये ऐकू नये, पाहूच नये अशीच- राज ठाकरे

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -