घरमहाराष्ट्रराजीव सातव यांच्या निधनाने तरुण, कर्तृत्वान व उमदं नेतृत्व गमावलं - नाना...

राजीव सातव यांच्या निधनाने तरुण, कर्तृत्वान व उमदं नेतृत्व गमावलं – नाना पटोले

Subscribe

खासदार राजीव सातव यांच्या निधनामुळे काँग्रेस पक्षाने एक तरुण, निष्ठावान, कर्तृत्ववान, अभ्यासू, प्रचंड क्षमता असलेला उमदा नेता गमावला असून काळाने माझा भाऊ हिरावून घेतला आहे. अशा शब्दांत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अध्यक्ष नाना पटोले यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या आहेत. राजीव सातव यांचं आज पुण्यातील जहांगीर रुग्णालयात वयाच्या ४६ व्या वर्षी दु:खद निधन झालं. राजीव सातव यांच्या जाण्याने राजकीय वर्तुळात हळहळ व्यक्त केली जात आहे.

राजीव सातव यांच्या निधनावर तीव्र दु:ख व्यक्त करताना नाना पटोले म्हणाले की, राजीव सातव यांनी युवक काँग्रेसच्या माध्यमातून आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात केली होती. काँग्रेस विचारांवार त्यांची प्रचंड श्रद्धा आणि निष्ठा होती. युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, राष्ट्रीय अध्यक्ष, अखिल भारतीय काँग्रेसचे सरचिटणीस, गुजरातचे प्रभारी काँग्रेस कार्य समितीचे सदस्य, गुजरातचे प्रभारी म्हणून पक्षसंघटनेत त्यांनी मोलाचे योगदान दिले. अत्यंत मनमिळावू स्वभाव व कुशल संघटक असणाऱ्या राजीव सातव यांनी युवक काँग्रेसच्या माध्यमातून तरुणांची मोठी फळी राजकारणात उभी केली.

- Advertisement -

पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य, विधानसभा सदस्य, लोकसभा सदस्य, राज्यसभा सदस्य म्हणून कार्यरत असताना त्यांनी कायम तळागाळातील कष्टकरी शेतकरी वर्गाचे प्रश्न सोडवण्यासाठी काम केले. केंद्र सरकारने आणलेल्या शेतकरीविरोधी काळ्या कायद्यांना त्यांनी राज्यसभेत अत्यंत आक्रमकपणे विरोध करून शेतक-यांची बाजू लावून धरली होती. गुजरातचे प्रभारी म्हणून कार्यरत असताना त्यांनी गुजरातमध्ये पक्षाची बांधणी करून काँग्रेस पक्षाला चांगले यश मिळवून दिले होते. पक्षाने त्यांना दिलेली प्रत्येक जबाबदारी आपल्या कौशल्याने व कर्तृत्वाने त्यांनी यशस्वीपणे पार पाडली. सोनियाजी व राहुलजी गांधी यांचे ते अत्यंत विश्वासू होते. राष्ट्रीय राजकारणातही आपल्या कामाने त्यांनी वेगळी ओळख निर्माण केली होती.

कोरोनावर मात करुन ते पुन्हा उभारी घेतील असे वाटत असतानाच आज सकाळी त्यांच्या निधनाचे वृत्त ऐकून निशब्द झालो. त्यांचे निधन काँग्रेस पक्षासाठी व वैयक्तीक आपल्यासाठी मोठा धक्का आहे. त्यांच्या निधनाने काँग्रेस पक्षाची व वैयक्तीक माझी कधीही न भरून येणारी हानी झाली आहे.

- Advertisement -

राजीव सातव यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी सातव कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहे, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.


हेही वाचा – राजीव सातव यांच्या निधनाचं वृत्त धक्कादायक; राजकीय वर्तुळात हळहळ व्यक्त


 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -