घरताज्या घडामोडीRamtek Sabha : पहिल्या टप्प्यातील मतदानापूर्वी पंतप्रधान मोदींची 10 एप्रिलला रामटेकला सभा

Ramtek Sabha : पहिल्या टप्प्यातील मतदानापूर्वी पंतप्रधान मोदींची 10 एप्रिलला रामटेकला सभा

Subscribe

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात 19 एप्रिलला विदर्भातील पाच लोकसभा मतदारसंघात मतदान होत असल्याने येथे भाजपच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या सभांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानुसार येत्या 10 एप्रिलला नरेंद्र मोदी रामटेक येथे पहिली जाहीर सभा घेणार आहेत. त्यानंतर 14 एप्रिलला दीक्षाभूमी येथे दर्शन आणि चंद्रपूर येथे जाहीर सभा प्रस्तावित आहे.

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात 19 एप्रिलला विदर्भातील पाच लोकसभा मतदारसंघात मतदान होत असल्याने येथे भाजपच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या सभांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानुसार येत्या 10 एप्रिलला नरेंद्र मोदी रामटेक येथे पहिली जाहीर सभा घेणार आहेत. त्यानंतर 14 एप्रिलला दीक्षाभूमी येथे दर्शन आणि चंद्रपूर येथे जाहीर सभा प्रस्तावित आहे. तर अमित शहा यांची 5 किंवा 6 एप्रिल रोजी विदर्भात पहिली सभा होणार आहे. याशिवाय राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा आणि अन्य शीर्षस्थ नेत्यांच्या सभांचेही वेळापत्रक लवकच जाहीर होईल, अशी माहिती भाजपचे आमदार प्रवीण दरेकर यांनी मंगळवारी येथे दिली. (Ramtek Sabha pm narendra modi meeting at ramtek on April 10 ahead of the first phase of polling)

लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची आखणी करण्यासाठी भाजपच्या निवडणूक व्यवस्थापन समितीची बैठक आज पार पडली. या बैठकीनंतर “आज महाराष्ट्राच्या व्यवस्थापन समितीची बैठक प्रभारी डॉ. दिनेश शर्मा यांच्या उपस्थितीत पार पडली. महाराष्ट्रात निवडणुकीच्या दृष्टीने व्यूहरचना काय आहे, कशा प्रकारची व्यवस्था, यंत्रणा उभी आहे. या यंत्रणेची अंमलबजावणी नेमकी कशा पद्धतीने होते आहे. याचा आढावा आणि मार्गदर्शक सूचना डॉ. दिनेश शर्मा यांच्या माध्यमातून देण्यात आल्या. व्यवस्थापन समितीच्या माध्यमातून प्रत्येकावर जबाबदारी देण्यात आली आहे”, असे प्रवीण दरेकर म्हणाले.

- Advertisement -

हेही वाचा – Hatkanangale Politics : धैर्यशील मानेंचा पत्ता होणार कट? शिवसेनेकडून निवेदिता मानेंची तयारी सुरू

दरम्यान, खासदार उन्मेश पाटील यांच्या ठाकरे गटातील प्रवेशावरही प्रवीण दरेकर यांनी भाष्य केले. “निवडणुकीच्या रणधुमाळीत अनेकजण इच्छुक असतात. काही जण उमेदवारी मिळाली नाही तरी पक्षाच्या विचाराशी एकनिष्ठ राहून काम करतात आणि एखाद्याला निवडणूक लढवायची असेल तर अशा प्रकारची भूमिका अनेक लोक अनेक पक्षात घेताना दिसतात. तशी भूमिक उन्मेश पाटील यांची आहे का? हे लवकरच समजेल. ठाकरेंना दुसऱ्यांनी टाकलेले उचलावे लागणार आहे. स्वतःकडे उमेदवार नाहीत. जे चांगले उमेदवार होते ते एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेले. उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवारांवर नजर टाकली तर सर्व उमेदवार आयात करून निवडणुका लढवत आहेत”, असे म्हणत त्यांनी ठाकरेंवर टीका केली.

- Advertisement -

हेही वाचा – Mahayuti Controversy: लोकसभेच्या जागांसाठी शिंदेंची भाजपशी झुंज; उमेदवार निश्चितीत भाजपचा हस्तक्षेप

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -