Maharashtra Assembly Election 2024
घरनवी मुंबईNavi Mumbai fire News : खैरणे एमआयडीसीतील नवभारत केमिकल कंपनीला आग

Navi Mumbai fire News : खैरणे एमआयडीसीतील नवभारत केमिकल कंपनीला आग

Subscribe

नवी मुंबईतील एमआयडीसीमध्ये मंगळवारी भीषण दुर्घटना घडली.एका केमिकल कंपनीला आग लागली.या आगीमुळे इतर दोन कंपन्यांनाही आग लागून त्यांचे प्रचंड नुकसान झाले.

नवी मुंबई : खैरणे एमआयडीसीतील नवभारत इंडस्ट्रीयल केमिकल कंपनीला मंगळवारी भीषण आग लागली.या आगीने नजीकच्या दोन कंपन्यांना देखील आपल्या विळख्यात घेतले. अग्निशमन दलाच्या बंबांनी घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रयत्न केले. आगीने अधिक पेट घेतल्याने परिसराला धुराने वेढा घातला होता.सुदैवाने या आगीत कोणतीही जिवितहानी झाली नाही.रात्री उशिरापर्यंत आगीवर नियंत्रण मिळविण्याचे काम सुरु होते. (fire in navbharat chemicals)

हेही वाचा..Khopoli News : वन खात्याच्या परवानगीनंतरही रस्ता जैसे थे! ताकई ग्रामस्थ आक्रमक

- Advertisement -

या विषयी अधिक माहिती देताना पावणे एमआयडीसीमधील इमर्जन्सी रिस्पॉन्स स्टेशनचे (ईआरएस) अग्निशमन अधिकारी सुरेंद्र चौधरी यांनी सांगितले की, ए-७३७/१, एमआयडीसी सेक्टर-२ खैरणे एमआयडीसी येथील सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास नवभारत केमिकल कंपनीला रसायानिक साठा असलेल्या ठिकाणी आग लागली.ही आग लागल्यानंतर मोठया प्रमाणावर केमिकलच्या ड्रमने पेट घेतला.त्यामुळे कंपनीच्या बाहेर केमिकल आल्याने रस्त्यावर ही पोहचली होती.या कंपनीला लागलेल्या आगीने काही क्षणातच भडका घेतल्याने कंपनीचा केमिकल प्लॅन्ट आणि गोदामानेही आगीच्या विळख्यात आली.बाहेर पडलेल्या केमिकलने पेट घेतल्याने एस.गोयंका कंपनी, जस्मीन प्रिंट लिमिटेड या दोन कंपन्यांना देखील आग लागली.या आगीत तिन्ही कंपन्यांचे मोठे नुकसान झाले आहे.

हेही वाचा… वनव्यात गारगांव येथील कातकरी वस्तीतील 9 घरे जळून खाक

- Advertisement -

दरम्यान आग लागल्यानंतर एमआयडीसीच्या अग्निशमक दलाच्या खैरणे, रबाळे, नेरुळ येथील अग्निशमक दलाच्या गाडया दाखल झाल्या तर आगीने रौद्र रुप धारण केल्याने आणि कंपनीत जाण्यासाठीचे मार्ग बंद झाल्याने एमआयडीसी व सिडकोच्या बाल्टो अग्निशमक दलाच्या वाहनांना पाचारण करावे लागले.त्याच बरोबर नवी मुंबई महानगरपालिका अग्निशमक दलाच्या ऐरोली, वाशी, नेरुळ, कोपरखैरणे आणि हार्डिया केमिकल व एमपीसीएलच्या अशा १२ अग्निशमक दलाच्या गाडयांची मदत घेण्यात आली. सुदैवाने या कंपनीत कोणतीही जिवितहानी झाली नसून शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज अग्निशमक दलाच्या अधिकार्‍यांनी व्यक्त केला आहे.

नवभारत इंडस्ट्रीजमध्ये काय बनते?

१९८५ पासून नवभारत इंडस्ट्रीज कार्यरत आहे.३५ वर्षांचा इतिहास असलेल्या नवभारत इंडस्ट्रीजच्या दादर आणि नवी मुंबईत दोन शाखा आहेत. नवभारत इंडस्ट्रीजकडून घरात वापरणारे एअरफ्रेशनर्स, बाथरुम्स आणि टॉयलेटसाठीचे एअर फ्रेशनर्स, कपडयांसाठीचे सुंगधी नॅप्थालीन बॉल्स आणि कॅम्फोर्स, फ्लोअर क्लिनर्स, कापुर व इतर सुंगधीद्रव्याच्या वस्तू इत्यादी उच्च दर्जाची एमएमसीजीची उत्पादने तयार केली जातात.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -