घरमहाराष्ट्रमामाचा अल्पवयीन भाचीवर बलात्कार

मामाचा अल्पवयीन भाचीवर बलात्कार

Subscribe

मामाने आपल्या अल्पवयीन भाचीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना चाकण उद्योगनगरीत घडली आहे. पीडित मुलगी ही घरात अभ्यास करत होती. त्यावेळी ही घटना घडली. याप्रकरणी पीडित मुलीने मामाविरोधात चाकण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. मात्र, त्यानंतर आरोपी मामाने गळफास घेत आत्महत्या केली आहे.

सोमवार (२६ नोव्हेंबर) सकाळी सातच्या सुमारास १३ वर्षीय पीडित मुलगी घरातील वरच्या मजल्यावर खोलीत अभ्यास करत बसली होती. यावेळी ३९ वर्षीय मामाने तिच्या खोलीत प्रवेश करत तिच्यावर अत्याचार केला. तसेच घडलेल्या प्रकाराबाबत कोणालाही सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. त्यामुळे पीडित मुलगी घाबरली होती. मात्र, तिने शनिवारी (१ डिसेंबर) आरोपी मामा विरोधात तक्रार दाखल केली. याप्रकरणी नराधम मामावर गुन्हा दाखल करण्यात आला होता.

- Advertisement -

दरम्यान, आरोपी मामाच्या या कृत्याबाबत पीडित मुलीने घरी सांगितल्यामुळे तिचे पालक व मामा यांच्यात वाद झाला. मुलीच्या पालकांनी आरोपी मामाच्या विरोधात लैंगिक अत्याचाराचे कलम ३०६ अन्वये गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. त्यानुसार पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल केला होता. मात्र, तत्पूर्वीच आरोपी मामाने गळफास लाऊन घेत आत्महत्या केली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -