घरमहाराष्ट्रRashmi Shukla : रश्मी शुक्ला यांना मुदतवाढ; पुढील दोन वर्ष DGP पदावर...

Rashmi Shukla : रश्मी शुक्ला यांना मुदतवाढ; पुढील दोन वर्ष DGP पदावर कायम

Subscribe

फोन टॅपींग प्रकरणी चर्चेत आलेल्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांना मुदतवाढ मिळण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती. त्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या स्वाक्षरीने शिक्कामोर्तब केले आहे.

मुंबई : पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांना अखेर मुदतवाढ देण्यात आली आहे. पुढील दोन वर्ष त्या पोलीस महासंचालक पदावर कायम राहणार असून, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या मुदतवाढीच्या फाइलवर स्वाक्षरी केली आहे. (Rashmi Shukla Rashmi Shuklas pay rise Continued as DGP for the next two years)

फोन टॅपींग प्रकरणी चर्चेत आलेल्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांना मुदतवाढ मिळण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती. त्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या स्वाक्षरीने शिक्कामोर्तब केले आहे. रश्मी शुक्ला यांना दोन वर्षांचा कार्यकाळ मिळण्याची शक्यता होती. तीसुद्धा सत्यात उतरली आहे. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री शुक्ला यांच्या मुदतवाढी संदर्भात सकारात्मक असल्याचे बोलले जात होते त्यावर शिक्का मोर्तब झाले आहे.

- Advertisement -

जानेवारी 2024 मध्ये आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांची महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालक आणि महानिरिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. यामुळे त्या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला पोलीस महासंचालक ठरल्या आहेत. असे असतानाच सेवानिवृत्तीची चार महिने शिल्लक असताच त्यांना मुदतवाढ मिळली असून, त्यांना मिळणाऱ्या मुदवाढीवरुन विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर टीका केली आहे.

हेही वाचा : Prakash Ambedkar : आरक्षणासाठी ओबीसी तुमच्यासोबत येईल, पण…; आंबेडकरांचे सूचक वक्तव्य

- Advertisement -

फोन टॅपींग प्रकरणी रश्मी शुक्ला यांच्यावर गुन्हा दाखल

राज्यात 2019 च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांचे फोन टॅप करण्यात आल्याचा आरोप रश्मी शुक्ला यांच्यावर करण्यात आला होता. रश्मी शुक्ला यांच्या सांगण्यावरून गुप्तवार्ता विभागाने नेत्यांचे फोन टॅप केले. महाविकास आघाडी सरकारमधील अनेक नेत्यांचा आरोप रश्मी शुक्लांवर करण्यात आलेला होता. रश्मी शुक्ला या राज्य गुप्त वार्ता विभागाच्या तत्कालीन आयुक्त पदावर कार्यरत होत्या. या प्रकरणी रश्मी शुक्ला यांच्याविरुद्ध पुण्यातल्या बंड गार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

हेही वाचा : Anandibai Joshi : नारायणभाऊ तुम्ही शहाणेसुरते आहात अशी माझी धारणा… अंधारेंचा निशाणा

कोण आहे रश्मी शुक्ला?

रश्मी शुक्ला या 1988 च्या बॅचच्या आयपीएस अधिकारी आहेत. महाराष्ट्र पोलिसांच्या सर्वात वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांपैकी त्या एक आहेत. त्यांनी सशस्त्र सीमा बल (SSB) चे केंद्र प्रमुख म्हणूनही काम केले. याशिवाय त्यांनी पुण्याचे पोलीस आयुक्त म्हणूनही काम पाहिले आहे. राज्यात फोन टॅपिंग प्रकरणात रश्मी शुक्लाचे नाव चर्चेत होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -