घरमहाराष्ट्रAnandibai Joshi : नारायणभाऊ तुम्ही शहाणेसुरते आहात अशी माझी धारणा... अंधारेंचा निशाणा

Anandibai Joshi : नारायणभाऊ तुम्ही शहाणेसुरते आहात अशी माझी धारणा… अंधारेंचा निशाणा

Subscribe

मुंबई : देशाच्या पहिल्या महिला डॉक्टर आनंदीबाई जोशी यांच्या स्मृतीदिनानिमित्त केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी सोमवारी एक पोस्ट शेअर केली होती. या पोस्टमुळे सोशल मीडियावर ते ट्रोलही झाले. त्याचसंदर्भात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी नारायण राणे यांच्यावर शरसंधान केले आहे.

हेही वाचा – Prakash Ambedkar : आरक्षणासाठी ओबीसी तुमच्यासोबत येईल, पण…; आंबेडकरांचे सूचक वक्तव्य

- Advertisement -

नारायण राणे यांनी शेअर केलेल्या पोस्टमध्ये त्यांनी डॉक्टर आनंदीबाई जोशी यांच्याऐवजी त्यांच्या जीवनावर आधारित चित्रपटात भूमिका साकारणारी अभिनेत्री भाग्यश्री मिलिंद हिचा फोटो लावला होता. ‘आनंदी गोपाळ’ हा चित्रपट 2019मध्ये प्रदर्शित झाला होता आणि या चित्रपटात आनंदीबाईंची भूमिका भाग्यश्री मिलिंद हिने साकारली होती. तिचाच फोटो नारायण राणे यांनी एका मोठ्या साईजमध्ये लावला होता आणि आनंदीबाई जोशी यांचे काही जुने आणि मूळ फोटो मागे ब्लरमध्ये लावण्यात आले होते. या पोस्टवरून नेटकऱ्यांनी नारायण राणे यांना लक्ष्य केले होते. त्यानंतर नारायण राणे यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून ही पोस्ट हटविली होती.

- Advertisement -

ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी याबाबत ट्वीट केले आहे. आनंदीबाई जोशीना अभिवादन करायलाच हवे. पण फोटो कुणाचा लावला आहे, हे तरी बघा. आनंदीबाई म्हणून चक्क अभिनेत्री भाग्यश्री मिलिंदचा फोटो? हे माझ्या भाच्याकडून (आमदार नितेश राणे) होणे मी समजू शकते. पण नारायणभाऊ तुम्ही शहाणेसुरते आहात, अशी माझी धारणा आहे, असा टोला त्यांनी लगावला आहे.

हेही वाचा – RBI Action: RBI ची SBI सह ‘या’ बँकांवर कारवाई; ठोठावला 2 कोटींचा दंड, काय आहे कारण?

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -