घरक्राइमReels Video : मुलींची छेडछाड करण्याच्या उद्देशाने तरुणाने बनवले रील; पोलिसांनी घडवली...

Reels Video : मुलींची छेडछाड करण्याच्या उद्देशाने तरुणाने बनवले रील; पोलिसांनी घडवली ‘अशी’ अद्दल

Subscribe

धुळे : सध्याच्या तरुणाईला सोशल मीडियाचं वेड लागलं आहे. झटपट प्रसिद्ध होण्यासाठी अनेक जण सोशल मीडियावर अनेक प्रकारची रील्स, व्हिडीओ तयार करून टाकताना दिसतात. मात्र लाईक्स, कमेंट्स मिळवण्याच्या नादात तरुणाई कोणत्याही गोष्टीचा विचार करताना दिसत नाही. रील बनवताना आपल्या आजूबाजूची सामाजिक परिस्थित बिघडेवल यांचे देखील भान त्यांना नसते. त्यामुळे अनेकदा नको त्या चूका करतात आणि त्यांच्या कृत्याचा अनेकांना राग येतो. धुळ्यातील एका तरुणाने मुलींची छेडछाड करण्याच्या उद्देशाने रील व्हिडीओ तयार केला, मात्र पोलिसांनी तत्काळ कारवाई करत त्याला वेळीच अद्दल घडवली आहे. (Reels Video made by a young man with the intention of teasing girls Police gave this punishment)

हेही वाचा – Narayan Rane : मैदानावरून खळ्यात ही यांची अधोगती; आदित्य ठाकरेंच्या ‘त्या’ भाकिताचा राणेंकडून समाचार

- Advertisement -

धुळे शहरातील देवपूर बस स्थानक परिसरात रविवारी (26 नोव्हेंबर) एका तरुणाने मुलींची छेडछाड करण्याच्या उद्देशाने एक रील व्हिडिओ तयार केला आणि आपल्या सोशल मीडियावर अकाऊंटवर पोस्ट केला. या व्हिडीओमध्ये तरुण महाविद्यालयीन विद्यार्थ्यींसमोर एका हिंदी गाण्यावर नृत्य करताना दिसत आहे. काही वेळातच या तरुणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला. मात्र व्हिडीओ व्हायरल करताना नेटकऱ्यांनी तरुणावर कडक कारवाईची मागणी केली.

हेही वाचा – CM Eknath Shinde : छगन भुजबळांच्या मागणीवर मुख्यमंत्री शिंदेंची प्रतिक्रिया, म्हणाले…

- Advertisement -

नेटकऱ्यांच्या मागणीनंतर धुळे पोलिसांनी रील बनवणाऱ्या तरुणाचा शोध घेण्यास सुरुवात केली. एलसीबीच्या पथकाने नरडाणा गावातून या तरुणाला ताब्यात घेतले आहे. राज पवार असे तरुणाचे नाव असून पोलिसांनी त्याला चांगलीच अद्दल घडवली आहे. तरुणाने रील व्हिडीओ बनवलेल्या देवपूर बन स्थानक परिसरात पोलीस त्याला घेऊन गेले. पोलिसांनी सर्व लोकांसमोर त्याची परेड काढली आणि तिथे उपस्थित मुलींची माफी मागण्यास त्याला सांगितले. यावेळी एका तरुणीने रील बनवणाऱ्या तरुणाच्या कानशीलात लगावल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे रील बनवणारा तरुण यापुढे मुलींची छेड काढण्याच्या उद्देशाने रील बनवणार नाही ऐवढे मात्र नक्की.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -