घरमहाराष्ट्रपारदर्शकतेसाठीच दोन दिवसांनी निकाल

पारदर्शकतेसाठीच दोन दिवसांनी निकाल

Subscribe

ईव्हीएममध्ये गडबड करण्यासाठी मतदानानंतर दोन दिवसानंतर निकाल होणार आहे, असा आरोप राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी केला आहे. पण या विधानावर राज्य निवडणूक आयोगाकडूनही भूमिका स्पष्ट करण्यात आली आहे. संपूर्ण निवडणूक प्रक्रियेत अधिकाधिक पारदर्शक प्रक्रियेने काम सुरू असते. ज्यामध्ये राजकीय पक्षांचे प्रतिनिधीही सगळ्या टप्प्यात सहभागी असतात. त्यामुळे आयोगासाठी काम करणारीसुद्धा माणसेच असतात, असे स्पष्टीकरण राज्य निवडणूक आयोगाकडून करण्यात आले आहे.

म्हणूनच दोन दिवसांचे अंतर
विधानसभा निवडणुकांसाठी मतदानाची तारीख २१ ऑक्टोबर आहे, तर मतमोजणी प्रक्रिया २४ ऑक्टोबरला आहे. अनेक मतदान केंद्राच्या ठिकाणी सुरक्षा दल तसेच राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींच्या समोर मतपेट्या सील करून त्या स्ट्राँग रूममध्ये पाठवण्याची संपूर्ण प्रक्रिया पार पडली जाते. म्हणूनच अनेकदा ही संपूर्ण प्रक्रिया पडण्यासाठी पहाटदेखील होते. अनेक ठिकाणी कर्मचारी आणि अधिकारी वर्ग अविरतपणे काम करतो. त्यासाठीच निवडणूक आयोगाने दोन दिवसांचा कालावधी हा मतदान व मतमोजणी दरम्यान ठेवलेला आहे, असे आयोगाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

- Advertisement -

यंदाच्या विधानसभेसाठी ६.५० लाख इतका कर्मचारीवृंद नेमण्यात येणार आहे. तर पोलिसांचाही मोठा फौजफाटा असणार आहे. केंद्रीय पोलिस दलाचाही समावेश करण्यात आला आहे. यंदाच्या विधानसभेसाठी १.१० लाख बॅलेट युनिट, १.३० लाख कंट्रोल युनिट आणि १.३५ लाख व्हीव्हीपॅट मशीनचा वापर करण्यात येणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -