घरमहाराष्ट्रNCP : अजित पवारांचे 22 आमदार पुन्हा शरद पवारांच्या राष्ट्रवादीत येणार, रोहित...

NCP : अजित पवारांचे 22 आमदार पुन्हा शरद पवारांच्या राष्ट्रवादीत येणार, रोहित पवारांचा दावा

Subscribe

पुणे : महायुतीतील लोकसभेसाठीच्या जागा वाटपाचा तिढा अद्यापही सुटलेला नाही. ज्यामुळे हा तिढा नेमका कधी सुटणार? असा प्रश्न निर्माण झाला आहे. महायुतीत सर्वाधिक संभ्रम हा अजित पवार यांच्या गटाबद्दल असून सर्वाधिक कमी जागा या त्यांनाच मिळणार असल्याचा दावा विरोधकांकडून करण्यात येत आहे. ज्यामुळे या सर्व काही चर्चा सुरू असताना आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी केलेल्या गौप्यस्फोटामुळे खळबळ उडाली आहे. आगामी लोकसभा निवडणूक पार पडल्यानंतर अजित पवार गटात गेलेले राष्ट्रवादीचे 22 आमदार परत शरद पवारांकडे येतील, असा मोठा दावा रोहित पवार यांनी केल्याने राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे. (Rohit Pawar claims that 22 MLAs of Ajit Pawar will return to Sharad Pawar’s NCP)

हेही वाचा… Maharashtra Politics : “वयानुसार वैचारिक प्रगल्भता…”, अजित पवारांच्या वक्तव्यावर सुप्रिया सुळेंचा टोला

- Advertisement -

राज्याच्या राजकारणात पडद्यामागे अनेक घडामोडी सुरू असल्याचे सर्वांनाच माहीत आहे. परंतु, अशा काही गोष्टी आहेत, ज्या केवळ राजकारणातील नेतेमंडळींनाच माहीत असतात. अशाच एका गोष्टीबाबत आमदार रोहित पवार यांच्याकडून खुलासा करण्यात आला आहे. एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना रोहित पवार म्हणाले की, अजित पवार गटातला एक नेता आमदार एकत्रित करतोय. 10 ते 12 आमदार आहेत ते भाजपाच्या चिन्हावर लढायचे म्हणत आहेत. राहिलेले 22 आमदार हे वेगळी भूमिका घेतील. त्यांचे म्हणणे असेल की शरद पवारांसोबत चला. मग त्यांच्या पक्षात कोण राहील? त्यामुळे 22 आमदार हे शरद पवारांकडे पुन्हा येणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.

तर, बंद खोलीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा म्हणतील आमचे ऐकावे लागेल. अजित पवारांना लोकसभेच्या फक्त 4 जागा मिळतील आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना 10 जागा मिळतील. अमित शहांचे त्यांना ऐकावेच लागेल. पण अजित पवारांची भूमिका त्यांच्या पक्षातील सगळ्याच नेत्यांना मान्य असेल असे नाही, असेही रोहित पवारांकडून सांगण्यात आले आहे. त्याशिवाय, बारामती लोकसभा मतदारसंघात काय होईल हे जनताच ठरवेल. अमित शहा, नरेंद्र मोदींना महाराष्ट्रात यावे लागते. कारण त्यांना लोकांची भीती आहे. बारामतीची जनता ही पवारांच्या विचारांच्या पाठिशी राहील. वेगवेगळे सर्व्हे असतात. मात्र महाविकास आघाडीला 30 जागा मिळतील. 18 ते 20 जागा महायूतीला मिळतील, असाही दावा आमदार रोहित पवारांकडून करण्यात आला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -