Eco friendly bappa Competition
घर देश-विदेश Live Updates : कोल्हापुरचे बाळूमामा देवस्थान ट्रस्ट बरखास्त

Live Updates : कोल्हापुरचे बाळूमामा देवस्थान ट्रस्ट बरखास्त

Subscribe

कोल्हापुरचे बाळूमामा देवस्थान ट्रस्ट बरखास्त

बाळूमामा देवस्थान समितीवर प्रशासकाची नेमणूक

- Advertisement -

शिवराज नायकवडी यांची प्रशासकपदी नियुक्ती

गैरप्रकार आणि ट्रस्टी नेमणुकीवरून होता वाद


- Advertisement -

फ्लाय दुूबई विमानाने उड्डाण घेताच आग लागल्याची घटना

घटनेनंतर प्रसंगावधान राखत काठमांडू विमानतळावर उतरविण्यात आले विमान

विमानाची तपासणी करून विमान दुबाईच्या दिशेने मार्गस्थ


महाराष्ट्रभूषण डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या नावे बनावट पत्र सोशल मीडियावर व्हायरल केल्याप्रकरणी पुण्यातून एकाला अटक करण्यात आली.


अनिल देशमुख प्रकरणी सचिन वाझेंना दिलासा नाही

२३ मे ला होणार पुढील सुनावणी


ट्रान्सहार्बर मार्गावरील वाहतूक विस्कळीत

वाशीहून ठाण्याकडे येणारी लोकल उशीराने


प्रसिद्ध पाकिस्तानी लेखक तारिक फतेह यांचे निधन

वयाच्या ७३ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

पाकिस्तानी असूनही तारिक फतेह यांचे भारतावर होते विशेष प्रेम


मुंबईतील पाली हिलमध्ये पाण्याची पाईपलाईन फुटली


खारघर दुर्घटनेबाबत मुंबई हायकोर्टात याचिका

शिंदे-फडणवीसांसह धर्माधिकांवर कारवाईची मागणी

अॅड. नितीन सातपुते यांची मुंबई हायकोर्टात याचिका


रितेश आणि जेनेलिया देशमुख यांना सहकार विभागाची क्लिन चीट


मुंबई पोलीस अधिकाऱ्यांची झाली बढती


छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे 28 एप्रिलला मॉरिशसमध्ये लोकार्पण

महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे येत्या शुक्रवारी 28 एप्रिल रोजी मॉरिशसमध्ये लोकार्पण होईल. मॉरिशसचे पंतप्रधान प्रवींद्रकुमार जगन्नाथ आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होणार असून, संपूर्ण देशासाठी हा अत्यंत अभिमानाचा क्षण असणार आहे.


औरंगाबाद नामांतरविरोधातील याचिकेवरील सुनावणी ७ जूनपर्यंत तहकूब

नामांतराबाबत अंतिम सूचना येईपर्यंत सरकारी दस्ताऐवजांवर नाव बदलू नका. उस्मानाबादप्रमाणे औरंगाबादचे निर्देश जारी करू. महाधिवक्ता बिरेंद्र सराफ यांची हायकोर्टात ग्वाही


बांग्लादेशचे नवे राष्ट्रपती म्हणून मोहम्मद शहाबुद्दीन यांनी घेतली शपथ

बांग्लादेशचे ज्येष्ठ नेता मोहम्मद शहाबुद्दीन यांनी आज २२ वे राष्ट्रपती म्हणून शपथ घेतली. या कार्यक्रमातबांग्लादेशच्या पंतप्रधान शेख हसीना आणि त्यांच्या मंत्रिमंडळाने या शासकीय कार्यक्रमला हजेरी लावली


संजय राऊत यांच्या कबड्डीच्या ट्वीटला देवेंद्र फडणवीसांचे कुस्तीचे ट्वीट करत उत्तर दिले


महाविकास आघाडीच्या वज्रमूठ सभांना शरद पवार गैरहजर राहणार

मुंबई १ मे रोजी महाविकास आघाडीची वज्रमूठ सभा होणार आहे. परंतु, या सभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार उपस्थित राहणार नसल्याची माहिती समोर आली आहे.


राज्य सरकारने खारघर दुर्घटनेतील मृत्यांचा आकडा जाहीर केला नाही

खारघर दुर्घटनेवर राज्य सरकारकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. श्रीसदस्यांच्या आकड्यामबाबत संभ्रम, अशी प्रतिक्रिया अंबादास दानवे यांनी राज्यपालांच्या भेटीनंतर माध्यमांना दिली.


नागपूर एमआयडीसीतील कटारिया अॅग्रोला आग; तीन कामगारांचा मृत्यू तर तीन जण जखमी

या दुर्घटनेत जखमींना उत्तम उपचार देण्याचे आदेश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे. घटनास्थळी आग विझविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या ८ गाड्या दाखल झाल्या आहेत


१६ आमदार अपात्र झाले तरी सरकारला धोका नाही – छगन भुजबळ

सर्वोच्च न्यायालयात १६ आमदार अपात्र झाले तरी सरकारला धोका नाही. परंतु, एकनाथ शिंदे अपात्र झाल्यानंतर मुख्यमंत्री बदलू शकतात.


ठाकरे गटाचे आमदार राज्यपाल रमेश बैस यांच्या भेटीला

खारघर दुर्घटनेबाबत राज्यपालांकडे चौकशी करुन कारवाईची मागणी करणार करण्यासाठी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, आमदार अनिल परब, खासदार अरविंद सावंत यांच्यासह आमदार ऋतुजा लटके, विधानपरिषदेचे प्रतोद विलास पोतनीस, आमदार सचिन अहिर, आमदार मनीषा कायंदे, आमदार रवींद्र वायकर, आमदार रमेश कोरगावकर हे सर्व आमदार उपस्थित होते.


नागपूर एमआयडीसीतील कटारिया  अॅग्रोला आग

अग्निशमन दलाच्या ८ गाड्या घटनास्थळी दाखल, ३ ते ४ कामगार अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे.


पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ऐकरी उल्लेख करणे दुर्दैवी – मुख्यमंत्री

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ऐकरी उल्लेख करणे हे दुर्दैवी आहे, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंच्या जळगावच्या सभेवर दिली.  उद्धव ठाकरेंनी जळगावच्या सभेत पंतप्रधानांचा ऐकरी उल्लेख केला होता.


वातावरणीय बदलासंदर्भात आज एक महत्वाची बैठक – मुख्यमंत्री

उष्णतेची लाट आणि पाणीटंचाईवर आज बैठक होणार आहे. या बैठकीत उपाययोजनांवर चर्चा होणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी माध्यमांना सांगितले.


पुणे विद्यापीठात अश्लील रॅप साँग शूट केल्याने ‘अभाविप’चा आक्रमक पवित्रा

अभाविपचा आंदोलनाकर्त्यांकडून अश्लील रॅप साँग शूट केल्याप्रकरणी पुणे विद्यापीठात तोडफोड करण्यात आली. त्याचबरोबर पुणे विद्यापीठाच्या प्रलंबित प्रश्नांवर अभाविचा आक्रमक झाली आहे. आंदोलकांनी विद्यापीठातील बैठक उधळून लावली


अंबादास दानवेंच्या नेतृत्वात ठाकरे गटाचे नेते राज्यपालांची भेट घेणार

विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यासोबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या आमदारांचे शिष्टमंडळ आज दुपारी १.३० वाजता राज्यपाल रमेश बैस यांची राजभवन येथे भेट घेणार आहेत. खारघरमधील श्रीसदस्यांच्या मृत्यूप्रकरणी राज्यपालांची भेट घेणार आहेत.  तसेच सायंकाळी ४.३० वाजता नवी मुंबई, पोलीस आयुक्त यांची भेट घेतील.


मोदींची बरोबरी करु नका; कुठे सूर्य कुठे तुम्ही…

उद्धव ठाकरेंनी जळगावच्या सभेत पंतप्रधान मोदींचा ऐकरी उल्लेख केला होता. या पार्श्वभूमीवर चंद्रशेखर बावनकुळेंनी संताप व्यक्त केला


निलंबित काँग्रेसचे नेते आशिष देशमुख यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतली

नागपूर भाजपच्या कार्यलयात चंद्रशेखर बावनकुळे दाखल झाले आहेत. या कार्यालयात देशमुख आणि बावनकुळेंच्या भेटीमुळे राजकीय वर्तुळता चर्चेला उधाण आले


तामिळनाडूच्या जी स्क्वेअर या खासगी रिअल इस्टेट डेव्हलपरच्या विविध ठिकाणी आयटी अधिकारींनी छापे टाकण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळलाी आहे.


छत्रपती संभाजीनगर मध्ये आज BRS पक्षाची जाहीर सभा होणार आहे.

या सभेत अनेक माजी आमदारांचा पक्षप्रवेश होणार आहे. तेलंगणाचे मुख्यमंत्री के सी राव यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश होणार आहे. तसेच कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांच्याकडे या सभेची जबाबदारी आहे.


मेघालयामधील पश्चिम काशीमध्ये भूकंपाचे झटके

पश्चिम काशीमध्ये ३.५ रिश्टर स्केलचा भूकंप, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.


मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याचा आज ५० वा वाढदिवस आहे. सचिनच्या चहात्यांकडून देशभरात वाढदिवस साजरा केला जात आहे


साई रिसॉर्ट प्रकरणातील आरोपींच्या जामिनावर आज मुंबई सत्र न्यायालयात सुनावणी होणार आहे.


रत्नागिरी रिफायनरीचे सर्वेक्षण आजपासून सुरू होणार आहे. रिफायनरी सर्वेक्षणासाठी २४ एप्रिल ते ३१ मे २०२३ हा काळावधी ठरवण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर जमावबंदीचा आदेश लागू करण्यात आली आहे.


औरंगाबाद नामांतर विरोधातील याचिकेवर आज सुनावणी होणार आहे. राज्य सरकारने वेळ मागीतल्याने प्रभारी मुख्य न्यायमूर्ती संजय गंगापूरवाला आणि न्यायमूर्ती संदीप मारणे यांच्या खंडपीठासमोर सुनावणी होणार आहे

 

 

 

 

 

 

 

 

 

- Advertisment -