घरउत्तर महाराष्ट्रSahitya Sammelan: शोभणे यांना आम्ही ओळखत नाही! संमेलनाध्यक्षांना 'विद्रोहीं'चा विरोध

Sahitya Sammelan: शोभणे यांना आम्ही ओळखत नाही! संमेलनाध्यक्षांना ‘विद्रोहीं’चा विरोध

Subscribe

जळगाव जिल्ह्यातील अमेळनेरध्ये आयोजित करण्यात आलेले 97 वे साहित्य संमेलन हे तब्बल 72 वर्षांनंतर पार पडत आहे. याआधी 1952 साली अमेळनरात भरविल्या गेले होते.

जळगाव : जळगाव जिल्ह्यातील अमेळनरमध्ये 2 फेब्रुवारीपासून 97 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनास सुरुवात झाली आहे. आज या साहित्य संमेलनाचा शेवटचा दिवस असून, या शेवटच्या दिवशीच साहित्य क्षेत्रात खळबळ उडवणारी घटना घडली आहे. कारण, संमेलनाध्य शोभणे यांना आम्ही ओळखतच नाही, ते चुकीच्या पद्धतीने आले असे म्हणत विद्रोही साहित्य संमलेनातील साहित्यिकांनी त्यांना विरोध केल्याची माहिती पुढे येत आहे. त्यामुळे साहित्य संमेलनातून पुन्हा एकदा वादाची ठिणगी पडल्याचे दिसून येत आहे. (Sahitya Sammelan We dont know Shobhane Opposition of the rebels to the conference president)

जळगाव जिल्ह्यातील अमेळनेरध्ये आयोजित करण्यात आलेले 97 वे साहित्य संमेलन हे तब्बल 72 वर्षांनंतर पार पडत आहे. याआधी 1952 साली अमेळनरात भरविल्या गेले होते.

- Advertisement -

महाराष्ट्र साहित्य परिषदेत प्रा. उषा तांबे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीत संमेलनाध्यक्षाची निकड, संमेलनातील कार्यक्रम, ग्रंथप्रदर्शन आदी निकषयांकर निर्णय घेण्यात होते. या बैठकीत संमेलनाध्यक्ष पदासाठी रवींद्र शोभणे यांच्या नाकावर एकमत झाले. विशेष म्हणजे यावेळी साहित्य महामंडळाने साहित्यिकांचा सन्मान राखण्यासाठी साहित्य संस्थांनी अध्यक्ष पदासाठी सुचविलेली नावे जाहीर न करण्याचा निर्णय घेतला होता हे विशेष.

हेही वाचा : Arvind Kejriwal : आमचं काही चुकलंच नाही तर भाजपात का जाऊ? केजरीवालांनी केली भूमिका स्पष्ट

- Advertisement -

नेमकं काय घडलं अमेळनरात?

जळगाव जिल्ह्यातील अमेळनरमध्ये दोन फेब्रुवारीपासून 97 वे अखिल भारतीय साहित्य संमेलन भरविले असून, आज या साहित्य संमेलनाचा शेवटचा दिवस आहे. दरम्यान याच अमेळनेरमध्ये 18 वे विद्रोही मराठी साहित्य संमेलन सुद्धा पार पडत आहे. दरम्यान आज साहित्य संमेलनाचे रवींद्र शोभणे विद्रोही साहित्य संमेलनाला भेट देण्यासाठी गेले असता त्यांना त्या ठिकाणी विद्रोही सहित्यिकांनी विरोध केल्याच्या प्रकार घडला. अध्यक्ष शोभणे यांना व्यासपीठाकडे जाण्यासाठी लोकांनी मज्जाव केला. त्यामुळे गोंधळ उडाला. दरम्यान असा कुठलाही प्रकार घडला नसल्याची प्रतिक्रिया रवींद्र शोभणे यांनी माध्यमांपुढे येत दिली.

हेही वाचा : प्रकाश आंबेडकरांची जागा वाटप फॉर्म्यूल्याची नव्याने निश्चितीची अट; शिवसेनाला अधिक तोटा

विद्रोही साहित्य संमेलन संयोजकांनी निवळलं प्रकरण

घडलेल्या प्रकारानंतर हे प्रकरण अधिक चर्चेला जाऊ नये म्हणून अध्यक्ष रवींद्र शोभणे यांना मिठाई खाऊ घातली. रवींद्र शोभणे यांनी तोंड गोड करुन घेतलं त्याबद्दल आम्ही त्यांचे आभार मानतो, असं विद्रोही साहित्य संमेलन संयोजन समितीकडून सांगण्यात आलं. यावेळी शोभणे संयोजकांना आता तुम्ही मनही गोड करुन घ्या, असं आवाहन केलं.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -