घरदेश-विदेशArvind Kejriwal : आमचं काही चुकलंच नाही तर भाजपात का जाऊ? केजरीवालांनी...

Arvind Kejriwal : आमचं काही चुकलंच नाही तर भाजपात का जाऊ? केजरीवालांनी केली भूमिका स्पष्ट

Subscribe

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल भाजपवर हल्लाबोल करत म्हणाले की, मी झुकणार नाही. आज हे लोक आमच्या मागे लागले आहेत तेच लोक माजी मंत्री मनीष सिसोदिया यांच्या मागे लागले होते. मनीष सिसोदियांवर घोटाळा केल्याचे आरोप केले जात असताना ते सकाळी 6 वाजता उठून शाळांमधून फिरत होते.

नवी दिल्ली : आमचे काही चुकले असते तर इतरांप्रमाणे आम्हीही भाजपमध्ये गेलो असतो. आणि आमच्यावर सुरू असलेले प्रकरणं बंद करण्यात आली असती. मात्र, आमचं काही चुकलं नाही मग आम्ही भाजपात का जाऊ? आमच्यावर लावण्यात आलेले सर्व आरोप खोटे आहेत. आज नाही तर उद्या सगळे आरोप कमी होतील. उर्वरित दिल्लीचे कोणतेही काम थांबू दिले जाणार नाही. जोपर्यंत माझ्यात दम आहे तोपर्यंत मी देशाची आणि समाजाची सेवा करत राहीन असा असा विश्वास मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी व्यक्त केला. ते नवी दिल्लीत बोलत होते. (Arvind Kejriwal Nothing is wrong then why we go to BJP Kejriwals role is clear)

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल भाजपवर हल्लाबोल करत म्हणाले की, मी झुकणार नाही. आज हे लोक आमच्या मागे लागले आहेत तेच लोक माजी मंत्री मनीष सिसोदिया यांच्या मागे लागले होते. मनीष सिसोदियांवर घोटाळा केल्याचे आरोप केले जात असताना ते सकाळी 6 वाजता उठून शाळांमधून फिरत होते. घोटाळे करणारे दारू पितो आणि मुलींची छेड काढतो असा आरोप त्यांच्यावर लावल्या जात आहे. परंतु मनीष सिसोदीयांचा दोष एवढाच आहे की, ते चांगल्या शाळा बांधत होते, सतेंद्र जैन चांगली रुग्णालये बांधत होते. हा त्यांचा दोष आहे. असे म्हणत मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी भाजपवर निशाणा साधला.

- Advertisement -

हेही वाचा : Uday Samant : बारामती ते मंत्रालय नाटकात धनंजय मुंडेंचा, तर माझा…; उदय सामंतांची तुफान फटकेबाजी

याचदरम्यान आप नेत्या मंत्री आतिशी यांनी पत्रकार परिषद घेऊन त्यांच्या निवासस्थानी पोहोचलेल्या गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांबद्दल सांगितले की, जे लोक एकनाथ शिंदे आणि इतर 11 आमदारांना फोडण्यासाठी आले होते तेच लोक आहेत जे ‘आप’च्या आमदारांना फोडण्यासाठी आले होते. जे लोक गेल्या 7 ते आठ वर्षांपासून विरोधी पक्षांची सरकारे (राज्यात) फोडण्याचा प्रयत्न करत आहेत. हेच लोक आपच्या आमदारांशी संपर्क साधत असल्याचाही गौप्यस्फोट त्यांनी केला आहे.

- Advertisement -

हेही वाचा : Uddhav Thackeray : “…तर मग सामान्य जनतेचे काय होणार?” गोळीबार प्रकरणावरून उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

केजरीवाल पुढे म्हणाले, माझ्यावर कोट्यवधी लोकांचे आशीर्वाद आहेत. मी झुकणार नाही. ते (भाजप) म्हणतात भाजपमध्ये या. भाजपमध्ये का आलात? का या म्हणतात भाजपमध्ये या तर भाजपमध्ये तुम्हाला सात खून माफ, मात्र, जनतेने माझ्यावर असाच विश्वास ठेऊन आशीर्वाद कायम ठेवला तर मी ईडी, सीबीआय, दिल्ली पोलीस आणि इन्कम टॅक्स हे सगळेच परतून लावू शकतो असेही मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यावेळी म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -