Maharashtra Assembly Election 2024
घरताज्या घडामोडीPawar Vs Pawar: काही जण म्हणतील ही माझी शेवटची निवडणूक; अजित दादांचा...

Pawar Vs Pawar: काही जण म्हणतील ही माझी शेवटची निवडणूक; अजित दादांचा शरद पवारांवर हल्लाबोल

Subscribe

बारामती (पुणे) – राष्ट्रवादी काँग्रेसमधील फूटीनंतर बारामतीत पवार विरुद्ध पवार लढत होणार का? याचे उत्तर अजित पवारांनी आज बारामतीत देऊन टाकले. ऐवढी वर्षे वरिष्ठांचे (शरद पवार) ऐकले एवढ्या वेळेस माझे ऐका, असे म्हणत माझ्या विचारांचा खासदार निवडून द्या, असे आवाहन अजित पवारांनी केले आहे. सुप्रिया सुळेंविरोधात अजित पवार वेगळा उमेदवार देणार हे आता स्पष्ट झाले आहे.

लोकसभा निवडणुकीची तयारी सर्वच पक्षांनी सुरु केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट बारामतीमध्ये आपले स्वतंत्र उमेदवार देणार असल्याचे आज (रविवार) उपमुख्यमंत्री अजित पवारांनी स्पष्ट केले. आज ते बारामती दौऱ्यावर आहेत. यावेळी विविध विकासकामांच्या उद्घाटनावेळी अजित पवारांनी शरद पवारांचा उल्लेख टाळून यावेळी वरिष्ठांचे नाही तर माझे ऐका, असे आवाहन बारामतीकरांना केले. ते म्हणाले, की येणाऱ्या काळात तुमच्यासमोर गंभीर समस्या निर्माण होणार आहे. एकीकडे अजित सांगतो असं करा, दुसरीकडे वरिष्ठ सांगतात असं करा. कुणाचं ऐकायचं? माझी एवढीच विनंती आहे, इतके दिवस तुम्ही वरिष्ठांचं ऐकलं आता माझं ऐका!

- Advertisement -

मोदी-शहांसोबत थेट संपर्क – अजित पवार
अजित पवारांनी बारामतीकरांना, माझ्या विचारांचा खासदार निवडून दिला तर काय होणार हेही सांगितले. ते म्हणाले, की आज नरेंद्र मोदी साहेब आणि अमित शहांसोबत माझे चांगले संबंध आहे. तुम्ही बघता आम्ही जेव्हा त्यांचे वेलकम करतो त्यावेळेस ते ओळखतात. आज देशाचा पंतप्रधान तुमच्या लोकप्रतिनिधीला ओळखतो. उद्या आपल्या विचाराचा खासदार असेल, मी म्हणेल तो खासदार निवडून दिला तर मी मोदी साहेबांना सांगेल, माझ्या लोकांनी तो खासदार निवडून दिला. ही कामे मी राज्य सरकारकडून केलेली आहेत, काही कामं केंद्राकडून करणं गरजेचं आहे. त्यामुळं ही माझी कामं झाली पाहिजे. माझी कामं म्हणजे माझ्या बारामतीकरांची, माझ्या इंदापूरकरांची, माझ्या दौंडकरांची, भोर, वेल्हा, मुळशीकरांची. माझ्या खडकवासलाकरांची, माझ्या पुरंदरवासियांची.

अजित पवार म्हणाले, की आतापर्यंत आपल्या आजूबाजूला किती तरी आमदार आणि खासदार होऊन गेले. पण आपल्या अडीनिडीला कोण आपल्याला उपयोगी पडतो याचाही विचार आपण करा, अजून खूप विकास कामे आपल्याला आपल्या परिसरात करायची असल्याचं अजित पवार यांनी सांगितलं.

- Advertisement -

काही म्हणतील ही माझी शेवटची निवडणूक..
शरद पवारांचे नाव न घेता अजित पवार म्हणाले, काही तुमच्याकडे येतील. भावनिक होतील, म्हणतील ही माझी शेवटची निवडणूक आहे. खरचं त्यांची शेवटची निवडणूक कधी होणार हे माहिती नाही. असं म्हणत अजित दादांनी त्यांच्या काकांची खिल्लीही उडवली. अजित पवार म्हणाले, तुम्ही भावनिक होऊ नका, ही माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे.

हेही वाचा : Jitendra Awhad : अजित पवारांनी हद्द केली, नेता म्हणून लाज…; जितेंद्र आव्हाड का संतापले?

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -