घरमहाराष्ट्रजनतेला सत्तर वर्षांत काय मिळालं, तर आठ चित्ते व गुंगी; रोखठोकमधून शिवसेनेचा...

जनतेला सत्तर वर्षांत काय मिळालं, तर आठ चित्ते व गुंगी; रोखठोकमधून शिवसेनेचा केंद्रावर हल्लाबोल

Subscribe

मुंबई – ‘नामिबियातील आठ चित्ते हिंदुस्थानातील स्वर्गात आले आहेत. त्यांच्यासाठी नवा स्वर्ग निर्माण करण्यात आला आहे. लोक त्या स्वर्गात दंग आणि गुंग झाले. हीच आपली लोकशाही! जनतेला सत्तर वर्षांत काय मिळालं, तर आठ चित्ते व गुंगी! प्रत्येकाचा स्वर्ग आणि गुंगीची मात्रा वेगळी आहे. हिटलर, पुतीन, स्टॅलिन आणि आपण सगळे नक्की कोणत्या स्वर्गात विहार करीत आहोत हा संशोधनाचाच विषय आहे,’ असा हल्लाबोल शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामना या वृत्तपत्रात रोखठोक या सदरातून करण्यात आलाय. नुकतेच भारतात आठ चित्ते आणण्यात आले. यावरून विरोधकांनी केंद्रावर टीकेची झोड उठवली. तसंच, शिवसेनेही यावर टीकास्त्र सोडलं आहे.

हेही वाचा – पालकमंत्र्यांची यादी अखेर जाहीर, चंद्रकांतदादांकडे पुणे, केसरकरांकडे मुंबई

- Advertisement -

‘सुमारे सत्तर वर्षांपासून आपल्या देशातून बरेच काही नामशेष झाले. गेल्या काही वर्षांत तर सत्य आणि अहिंसादेखील नामशेष झाल्यासारखे वाटते. न्याय तर दिवा घेऊन शोधावा लागतो. सत्तर वर्षांपासून काय काय नामशेष झाले ते सर्व मिळवून देण्याच्या बोलीवर मोदी व त्यांचा पक्ष सत्तेवर आला, पण सुमारे 70 वर्षांपूर्वी हिंदुस्थानातून नामशेष झालेले चित्ते पंतप्रधान मोदींच्या वाढदिवशी पुन्हा एकदा हिंदुस्थानात दाखल झाल्याने ‘भाजप’ नामक राजकीय पक्षाने काय मोठा उत्सव साजरा केला? हे चित्ते ‘नामिबिया’ नामक आफ्रिकी देशाने दिले, पण भाजपच्या काही लोकांनी असे वातावरण तयार केले की, हे आठ चित्ते त्यांच्याच प्रयोगशाळेत ‘टेस्ट टय़ूब’द्वारे जन्मास घातले व पंतप्रधान मोदी यांनी ते मध्य प्रदेशच्या ‘कुनो’ राष्ट्रीय उद्यानात सोडले,’ असं या रोखठोकमध्ये म्हटलं आहे.

हेही वाचा – दसरा मेळाव्यावर राज ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांना दिला होता ‘हा’ सल्ला, मनसे नेते प्रकाश महाजन यांचा दावा

- Advertisement -

आनंदाचा अतिरेक तरी किती करावा?

आठ चित्ते व त्यांना जंगलात सोडणारे आपले पंतप्रधान यांचे दर्शन सर्व वृत्तवाहिन्यांवर पुढचे 72 तास घडत होते. आठ चित्ते आले यापेक्षा दुसरी कोणतीच घडामोड त्यांना दिसत नव्हती. परदेशात दडवलेला 72 लाख कोटी काळा पैसा पेटारे भरून आणला असता तर देश अधिक आनंदी झाला असता. चित्ते आणले हा आनंदच आहे, पण आनंदाचा अतिरेक तरी किती करावा? त्यास काही मर्यादा? स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात देशाला आठ चित्ते मिळाले व त्याबद्दल तेव्हाच्या सत्ताधारी पक्षाने आनंदाचा उत्सव साजरा केला याची नोंद इतिहासात जरूर व्हायला हवी, असा टोलाही यामधून लगावण्यता आला आहे.

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -