घरमहाराष्ट्रSanjay Nirupam : 'त्यांच्या' तक्रारींची दखल घेतली असती तर...; निरुपम यांचा मोठा...

Sanjay Nirupam : ‘त्यांच्या’ तक्रारींची दखल घेतली असती तर…; निरुपम यांचा मोठा गौप्यस्फोट

Subscribe

काही दिवसांपासून काँग्रेसमध्ये मोठी फूट पडणार असल्याची चर्चा सुरू होती. काही दिवसांपूर्वी दक्षिण मुंबईचे माजी खासदार मिलिंद देवरा यांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्यानंतर अगदी दोन दिवसांपूर्वीच काँग्रेसचे माजी आमदार बाबा सिद्दीकी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (अजित पवार गट) प्रवेश केला.

मुंबई : माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानंतर राजभरात एकच खळबळ उडाली. चव्हाणांच्या या राजीनाम्याबाबत उलट सुलट प्रतिक्रिया उमटत असतानाच मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष संजय निरुपम यांनी याबाबत मोठा गौप्यस्फोट केला आहे. अशोक चव्हाणांच्या तक्रारींची वेळीच दखल घेतली असती तर ही परिस्थिती उद्भवलीच नसती असेही ते म्हणाले. (Sanjay Nirupam If their complaints had been heeded Nirupams big secret blast)

काही दिवसांपासून काँग्रेसमध्ये मोठी फूट पडणार असल्याची चर्चा सुरू होती. काही दिवसांपूर्वी दक्षिण मुंबईचे माजी खासदार मिलिंद देवरा यांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्यानंतर अगदी दोन दिवसांपूर्वीच काँग्रेसचे माजी आमदार बाबा सिद्दीकी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (अजित पवार गट) प्रवेश केला. परंतु, त्यानंतर आता माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनीच काँग्रेसचा हात सोडण्याचा निर्णय घेतल्याने काँग्रेसला हा आतापर्यंतचा सर्वात मोठा धक्का मानला जात आहे.

- Advertisement -

अशोक चव्हाणांनी सकाळीच विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची भेट घेऊन त्यांच्या आमदारकीचाही राजीनामा दिला.
तर काही वेळापूर्वीच माध्यमांसमोर येत अशोक चव्हाण यांनी आपण पुढील दोन दिवसांत भूमिका स्पष्ट करणार असल्याचे ते म्हणाले. दरम्यान मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष संजय निरुपम यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंट X वर पोस्ट करत अशोक चव्हाणांच्या राजीनाम्या मागील कारण सांगितलं आहे.

- Advertisement -

हेही वाचा : अशोक चव्हाणांची काँग्रेसला सोडचिठ्ठी, भाजपात करणार प्रवेश | Ashok Chavan

काय म्हणाले संजय निरुपम?

माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्यावर भाष्य करणारं ट्वीट मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष संजय निरुपम यांनी लिहिले की, अशोक चव्हाण यांनी पक्षासाठी मोठं योगदान दिलं. कोणी त्याला उत्तरदायित्व म्हणत आहेत, कोणी ईडीला जबाबदार धरत आहेत, ही सर्व उतावीळ प्रतिक्रिया आहे. मुळात महाराष्ट्रातील एका नेत्याच्या कार्यशैलीवर ते खूप नाराज होते. याची माहिती त्यांनी वेळोवेळी वरिष्ठ नेतृत्वाला दिली होती. त्यांच्या तक्रारींची गांभीर्याने दखल घेतली असती तर ही परिस्थिती उद्भवली नसती.

हेही वाचा : Sushilkumar Shinde On Ashok Chavan: काँग्रेस नेते जाण्याची ही पहिली वेळ नाही – सुशीलकुमार शिंदे

अशोक चव्हाण हे साधनसंपन्न, कुशल संघटक, जमिनीवर पक्की पकड असलेले आणि महत्त्वाचे नेते आहेत. गेल्या वर्षी जेव्हा भारत जोडो यात्रा नांदेडमध्ये पाच दिवस होती, तेव्हा संपूर्ण वरिष्ठ नेतृत्वाने त्यांची क्षमता प्रत्यक्ष पाहिली होती. त्यांचे काँग्रेस सोडणे हे आमच्यासाठी मोठे नुकसान आहे. हे नुकसान कुणीच भरुन काढणार नाही. त्यांची काळजी घेण्याची जबाबदारी आमचीच होती. अशा शब्दांत संजय निरुपम यांनी त्यांची खंत आणि काँग्रेस पक्षाविषयीची चिंता बोलून दाखवली आहे.

तो नेता कोण?

काँग्रेसचे माजी अध्यक्ष संजय निरुपम यांनी केलेल्या ट्वीटमध्ये लिहिले आहे की, महाराष्ट्रातील एका नेत्याच्या कार्यशैलीवर ते खूप नाराज होते. तेव्हा तो नेता कोण? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे. तर काँग्रेसचे विधान परिषदेचे आमदार सत्यजित तांबे यांनी आपल्याला खूप बोलायचं आहे पण बोलणार नाही असं सूचक वक्तव्य केलं होतं. तेव्हा काँग्रेसमधील तो नेता कोण? याबाबत चर्चा रंगत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -