घरमहाराष्ट्रसंजय राऊतांनी काढला ईडीचा घोटाळा बाहेर, जितेंद्र नवलानींवर केले गंभीर आरोप

संजय राऊतांनी काढला ईडीचा घोटाळा बाहेर, जितेंद्र नवलानींवर केले गंभीर आरोप

Subscribe

यावेळी संजय राऊत म्हणाले, सगळे पुरावे मी दिले आहेत. ईडीच्या अधिकाऱ्यांचं जे खंडणी वसुलीचे रॅकेट आहे, त्याच्यामध्ये जो की फॅक्टर आहे, त्याचं नाव आहे, मिस्टर जितेंद्र चंद्रलाल नवलानी. त्याचा पॅन नंबर आणि त्याच्या सात वेगवेगळ्या कंपन्यांची नावं मी तुम्हाला दिलेली आहेत. या

मुंबईः शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आज पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेत ईडीवर गंभीर आरोप केलेत. ईडीचे अधिकारी आणि भाजप नेते कशा पद्धतीनं भ्रष्टाचार करत आहे, याचा लेखाजोगाच शिवसेना खासदार संजय राऊतांनी दिला आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत आणि खासदार अरविंद सावंत यांनी शिवसेना भवनात संयुक्त पत्रकार परिषद घेतली असून, त्यांनी ईडीचे अधिकारी जितेंद्र नवलानींवर गंभीर आरोप केलेत. राज्यात ईडी, सीबीआय आणि आयटीच्या धाडीवरून संजय राऊत यांनी भाजपवर निशाणा साधलाय.

यावेळी संजय राऊत म्हणाले, सगळे पुरावे मी दिले आहेत. ईडीच्या अधिकाऱ्यांचं जे खंडणी वसुलीचे रॅकेट आहे, त्याच्यामध्ये जो की फॅक्टर आहे, त्याचं नाव आहे, मिस्टर जितेंद्र चंद्रलाल नवलानी. त्याचा पॅन नंबर आणि त्याच्या सात वेगवेगळ्या कंपन्यांची नावं मी तुम्हाला दिलेली आहेत. या सात कंपन्यांनी 100 हून अधिक बिल्डर्स आणि डेव्हलपर्सकडून वसुली केली आहे. एक्स्टॉर्शन केलं आहे. ज्यात कॅशसुद्धा आहे आणि चेक पेमेंटही आहे. डिजिटल ट्रान्सफर त्यात आहे. ज्या ज्या कंपन्यांचा ईडीनं तपास केला. त्या कंपन्यांनी आपला पैसा जितेंद्र नवलानीच्या या सात कंपन्यांमध्ये ट्रान्सफर केला आहे. नवलानी हे ईडीचे वरिष्ठ अधिकारी आहेत. डायरेक्टर, जॉइंट डायरेक्टर यांच्यासाठी काम करतात.

- Advertisement -

2017 मध्ये ईडीने दिवान हाऊसिंग फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेडची चौकशी सुरू केली. अचानक जितेंद्र चंद्रलाल नवलानी आणि त्यांच्या सात कंपन्यांच्या खात्यात दिवान हाऊसिंग फायनान्स आणि त्याच्याशी संबंधित कंपनीकडून 25 कोटी रुपये ट्रान्सफर करण्यात आले होते. त्यानंतर 31 मार्च 2020 पर्यंत एस आर वाधवान आणि त्यांच्या कुटुंबीयांकडून जितेंद्र नवलानीच्या कंपन्यांच्या खात्यात आणखी 15 कोटी ट्रान्सफर करण्यात आले. अशाच प्रकारे अविनाश भोसले आणि त्यांच्या प्रकरणांची ईडीनं चौकशी सुरू केली, त्यानंतर तात्काळ अविनाश भोसले आणि त्यांच्या ग्रुपकडून 10 कोटी रुपये जितेंद्र नवलानी आणि त्यांच्या सात कंपन्यांमध्ये ट्रान्सफर करण्यात आल्याचंही संजय राऊतांनी सांगितलंय.

युनायटेड फॉस्परसच्या प्रकरणातही हेच झालंय. जशी ईडीची चौकशी सुरू झाली. जितेंद्र नवलानीच्या सात कंपन्यांमध्ये 16 कोटी रुपये ट्रान्सफर झालेत. गेलॉर्ड कंपनी लिमिटेडबरोबरही असंच झालंय. या कंपनीविरोधात ईडीची चौकशी सुरू झाल्यानंतर 10 कोटी रुपये नवलानीची कंपनी सिक्योरेट सिस्टीममध्ये अन सिक्युअर्ड लोनच्या स्वरूपात टाकण्यात आले. ही खूपच गंभीर बाब आहे. ईडीची चौकशी सुरू झाली, मग मॉन्सेर फायर प्रोटेक्शन प्रायव्हेट लिमिटेडनी लगेच 15 कोटी रुपये नवलानींच्या कंपन्यांमध्ये ट्रान्सफर केले. अशाच प्रकारे मिरका केमिकल्स चौकशी सुरू झाली, त्यानंतर नवलानीच्या खात्यात 10 कोटी आणि पुन्हा ईडीआयएलच्या कंपनीकडून 15 कोटी कर्जाच्या स्वरूपात नवलानींच्या खात्यात ट्रान्सफर झाले, असंही गंभीर आरोप संजय राऊतांनी केलेत.

- Advertisement -

मी पंतप्रधानांना सांगितलं की ही लिस्ट एंडलेस आहे. पैसे फक्त नवनालीच्या कंपनीमध्येच ट्रान्सफर झालेले नाही. अजूनही बरेच असे लोक आहेत, ज्यात ईडीचा पैसा कॅश अँड चेकच्या माध्यमातून ट्रान्सफर झालाय. पैशांची फिगर माझ्याकडे आहे. ईडीच्या कोणत्या अधिकाऱ्याचा पैसा त्यात आहे, कुठे देवाणघेवाण झाली आहे. किती पैशांची देवाणघेवाण झालीय. पैसा कुठे गेला आहे. मी हळूहळू तुम्हाला सांगणार आहे, असंही संजय राऊत म्हणालेत.

जितेंद्र नवलानी कोण?

जितेंद्र नवलानी कोण आहे, तो कुठे आहे. तो कोणाचा माणूस आहे, किरीट सोमय्या आणि त्यांचा काय संबंध आहे. ईडीचे सर्वात मोठे अधिकारी मुंबई दिल्ली इन्चार्ज त्यांचा काय संबंध आहे. यांच्या अकाऊंटमध्ये पैसा का ट्रान्सफर होत आहे. दिवान हाऊसिंग, राणा कपूर, ओमकार बिल्डर्स, सीजीआयएस यांसारख्या कंपन्या ज्या पब्लिक सेक्टर बँकांच्या कर्जही फेडू शकत नाहीत. ते जितेंद्र नवलानी आणि त्यांच्या कंपनीला कोटीच्या कोटी रुपये का देत आहेत. कन्स्लटन्सी फी आहे ही, कसली कन्स्लटन्सी फी आहे. कोणी ऑफिस, कोणी स्टाफ नाही. हा सर्व पैसा मुंबई आणि दिल्लीत बसलेल्या ईडी ऑफिसरसाठी जमा होत आहे. त्यातून बाहेरच्या देशात बेनामी प्रॉपर्टी खरेदी केली जात आहे. या रॅकेटमध्ये महाराष्ट्र आणि मुंबईचे भाजपचे प्रमुख नेतेही जोडलेले असल्याचा आरोपही त्यांनी केलाय.

जितेंद्र नवलानी आणि रॅकेटसंदर्भात मुंबई पोलिसांत एफआयआर दाखल

मी हवेत बोलत नाही, मी कागदपत्रंही दिले आहेत. मुंबईत बसून सगळं सुरू आहे, दिल्लीत बसून सुरू आहे. महाविकास आघाडीच्या लोकांना त्रास देण्याचं काम आहे. हे या रॅकेटचाच एक भाग आहे. आज मी सांगिललेली गोष्ट फक्त 10 टक्के आहे. त्यासंदर्भात सेंट्रल एजन्सीचा एक व्हिजिलन्स रिपोर्टही आला आहे. जी माहिती सांगितली आहे, ती पंतप्रधानांनाही दिलीय. आज दुपारी जितेंद्र नवलानी आणि रॅकेट यासंदर्भात मुंबई पोलिसांत एक एफआयआर दाखल केलाय. आम्ही ही तक्रार मुंबईचे पोलीस आयुक्तांकडे करप्शन, एक्स्टॉर्शन, खंडणी चार ईडी अधिकाऱ्यांविरोधात जितेंद्र नवलानीच्या माहितीसह केली आहे. मुंबई पोलीस या क्रिमिनल सिंडिकेटची चौकशी आजपासून सुरू करत आहे. ईडीचे काही अधिकारी तुरुंगात जाऊ शकतात. मुंबईत कोटी कोटी रुपये कुठे जात आहेत. पीएम केअर फंडात जात आहेत काय, तर नाही तुमच्या घरात जात आहेत. परदेशात जात आहेत. परदेशात जात असून, हेसुद्धा रॅकेट मी उघड करणार आहे. या वसुली एजंटमध्ये भाजपचे नेतेसुद्धा सामील आहेत. मी ईडीकडे कागद दिले आहेत, पण त्यावर कोणतीही कारवाई झालेली नाही, असंही संजय राऊतांनी सांगितलंय.


हेही वाचाः Maharashtra Assembly Budget Session 2022 : खासगी शाळेतील शिक्षकांना महात्मा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ मिळवून देणार – बच्चू कडू

Vaibhav Desai
Vaibhav Desaihttps://www.mymahanagar.com/author/vaibhavr/
गेल्या 14 वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत; प्रिंट मीडिया चार वर्षे अनुभव, डिजिटल माध्यमाचा साडेनऊ वर्षांचा अनुभव आहे. तसेच अर्थकारण विषयावर लिखाणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -