घरमहाराष्ट्र"त्या भावनेतून ठाकरेंनी राजीनामा दिला," संजय राऊतांनी केला खुलासा

“त्या भावनेतून ठाकरेंनी राजीनामा दिला,” संजय राऊतांनी केला खुलासा

Subscribe

उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर महाविकास आघाडीला विचारात न घेता राजीनामा का दिला? याबाबत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्याकडून खुलासा करण्यात आला आहे.

2022 हे वर्ष महाराष्ट्रातील राजकारणासाठी महत्त्वाचे मानले जाते. कारण 2022 मध्ये राजकारणातील जे महानाट्य घडले, ते याआधी कधीही घडले नव्हते. एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडीमध्ये सर्व काही सुरळीत सुरू असताना देखील केलेले बंड, त्यानंतर शिवसेनेला पडलेले खिंडार आणि यामुळे महाविकास आघाडीचे राज्यातील कोसळलेले सरकार यामुळे राज्यातील राजकारणात मोठा राजकीय भूकंप घडला होता. पण त्यावेळी घडलेल्या घटनेबाबत आजही अनेक खुलासे करण्यात येत आहेत.

एकनाथ शिंदे यांच्या बंडांनंतर महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तडकाफडकी राजीनामा दिला होता. पण त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीला विचारात न घेता मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला, असे अलीकडेच एका मुलाखतीत शरद पवार यांच्याकडून सांगण्यात आले आहे. पण शरद पवार यांच्या या विधानाला खोडत उद्धव ठाकरे यांनी त्यावेळी राजीनामा का दिला? याबाबत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्याकडून खुलासा करण्यात आला आहे.

- Advertisement -

उद्धव ठाकरे यांच्या राजीनाम्याबाबत बोलताना संजय राऊत म्हणाले की, “पवार अनेकदा ते मातोश्रीवर आले आहेत. उद्धव ठाकरेंनीही सिल्व्हर ओकला जाऊन त्यांची भेट, मार्गदर्शन घेतले आहे. उद्धव ठाकरेंनी राजीनामा देऊ नये, बहुमत चाचणीला सामोरे जावे अशी सगळ्यांची इच्छा होती. परंतु अतिसंवेदनशील असल्याने उद्धव ठाकरेंना ते सहन झाले नाही. आपलीच माणसे ज्यांना इतके काय दिले तरीही ते सोडून गेले. त्या भावनेतून ठाकरेंनी राजीनामा दिला. परंतु त्यावरून आता वाईट वाटण्याचं कारण नाही.”

तसेच “विधानसभेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा नाना पटोलेंनी द्यायला नको होता. परंतु कुठलीही चर्चा न करता तो निर्णय घेतला गेला. महाविकास आघाडी सरकार पडण्याची सुरुवात तिथून झाली. आता हा विषय होऊन गेला. आहे त्या परिस्थितीला सामोरे जाऊन लढत जाऊ. शरद पवार हे अनुभवी नेते, संसद पाहिलीय, संसदीय राजकारणात ५० वर्षापासून जास्त आहे. त्यामुळे त्यांनी अनेकदा ते मत मांडले आहे.” असेही संजय राऊत यांच्याकडून सांगण्यात आले आहे.

- Advertisement -

बाळासाहेब कळायला फार सोपे होते, अखंड वाचन करणारे, लोकांना भेटणारे, प्रचंड मेहनत करणारे व्यक्ती होते. लोकांना कळायला अवघड वाटेल परंतु समोर गेल्यावर ते आपल्यासारखेच असतात. शरद पवारही मोठे नेते आहेत. शरद पवारांचे राजकारण घातकी नाही. देशात त्यांच्याबद्दल प्रतिमा निर्माण करण्यात आली. वसंतदादा पाटलांचे सरकार पाडल्यानंतर त्यांची प्रतिमा बदलली, या देशात सरकारे पाडली गेली नाहीत का? सरकार पहिल्यांदाच पाडले जातायेत असं नाही. फक्त शरद पवारांनीच सरकार पाडले असे नाही, असे सांगत संजय राऊत यांनी शरद पवार यांच्याबाबत सुरू असलेल्या राजकीय चर्चांबाबत आपले मत व्यक्त केले आहे.


हेही वाचा – राष्ट्रवादी-भाजपा एकत्र आली तर शिवसेना सत्तेतून बाहेर पडणार! 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -