घरमहाराष्ट्रपुणेपुणेकरांसाठी आनंदाची बातमी! घरपट्टीमध्ये ४० टक्के सवलत लागू

पुणेकरांसाठी आनंदाची बातमी! घरपट्टीमध्ये ४० टक्के सवलत लागू

Subscribe

पुणे शहरातील नागरिकांना मंत्रिमंडळाने एक गोड बातमी दिलीय. पुणेकरांच्या बजेटमध्ये वर्षभरात ४० टक्के रकमेची बचत होणार आहे.

पुणे शहरातील नागरिकांना मंत्रिमंडळाने एक गोड बातमी दिलीय. पुणेकरांच्या बजेटमध्ये वर्षभरात ४० टक्के रकमेची बचत होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठक हा मोठा निर्णय घेण्यात आला. पुणे महापालिकेमार्फत स्वतःच्या मालकीच्या घरात राहत असल्यास घरपट्टीमध्ये ४० टक्के सवलत यापुर्वी मिळत होती. ही सवलत पुन्हा सुरू करण्याबाबत पुणेकर नागरिकांची असलेली अनेक वर्षांपासुनची मागणी अखेर मान्य करण्यात आली आहे. पुण्याचे पालकमंत्री व उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी यासाठी पुढाकार घेतला होता. या निर्णयामुळे पुणेकरांचा फायदा होणार आहे. तसेच यापूर्वी ज्यांनी कर भरला आहे, त्याची रक्कम आगामी बिलातून कमी करण्याचा निर्णय झाला आहे.

पुणे महापालिकेमार्फत स्वतःच्या मालकीच्या घरात राहत असल्यास नागरिकांना घरपट्टीमध्ये ४० टक्के सवलत दिली आहे. आज झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत यावर शिक्कामोर्तब करण्यात आलाय, असे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. पुणे महानगरपालिकेच्या हद्दीतील मालमत्ता कर आकारणी करतांना वार्षिक भाड्यातून आता 15% सवलत मिळणार आहे. यापूर्वी ही सवलत 10% होती. परंतु मालमत्ताधारक स्वत: राहण्यासाठी वापर असल्यास त्यांना वार्षीक मालमत्ता करपात्र रक्कम निश्चित करतांना 40% सवलत देण्यास शासनाने मान्यता दिली.

- Advertisement -

भाजपच्या शिष्ठमंडळाने काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेऊन न मिळकत करात देण्यात येणारी 40 टक्के सवलत कायम ठेवण्याची मागणी केली होती. आता या निर्णयामुळे पुणेकरांची अतिरिक्त करातून सुटका होणार आहे. विशेष म्हणजे 2010 पासूनची देखभाल दुरुस्तीची 5 टक्के वसुलीही केली जाणार नाही.

यामुळे 40 % सवलतीचा लाभ घेतलेल्या अंदाजे 5.4 लाखांपेक्षा अधिक मालमत्ताधारकांकडुन सुमारे रु. 401 कोटीहुन अधिक व 15% वजावटीचा लाभ घेतलेल्या अंदाजे 8.82 लाख मालमत्ता धारकांकडुन सुमारे 141.087 कोटी इतकी फरकाची रक्कम वसुलीची कारवाई करणे आवश्यक होते. अशाप्रकारे मोठ्या प्रमाणात असलेली फरकाची रक्कम पुर्वलक्षी प्रभावाने वसुल करावयाची झाल्यास मालमत्ता धारकांवर खूप मोठा बोजा पडणार असल्याने पुणे महानगरपालिकेने 28 ऑगस्ट 2019 रोजी पुन्हा एक मुख्य सभा ठराव पारित करुन या सवलतीमुळे वसुली करावयाची थकबाकीची रक्कम पुर्वलक्षी प्रभावाने करु नये व 2019 पर्यंत ज्या पध्दतीने सवलत देण्यात येत होती ती तशीच यापुढेही सुरू राहावी अशी मागणी शासनाकडे केली होती.

- Advertisement -

यानुसार 01 एप्रिल 2023 पासून पुणे महानगरपालिकेच्या हद्दीतील मालमत्ता कर आकारणी करतांना वार्षिक भाड्यातून 10% ऐवजी 15% सवलत आणि मालमत्ताधारक स्वत: राहण्यासाठी मालमत्तेचा वापर करत असल्यास त्यांना वार्षीक मालमत्ता करपात्र रक्कम निश्चित करतांना 40% सवलत लागू होणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -