Eco friendly bappa Competition
घर महाराष्ट्र "दीडशहाणे मंत्री कालपर्यंत..." कांद्याच्या प्रश्नावरून संजय राऊतांनी दादा भुसेंना केले लक्ष

“दीडशहाणे मंत्री कालपर्यंत…” कांद्याच्या प्रश्नावरून संजय राऊतांनी दादा भुसेंना केले लक्ष

Subscribe

ज्यांना कांद्याचा सध्याचा दर परवडत नाही, त्यांनी दोन चार महिने कांदे खाल्ला नाही तर काय बिघडणार आहे? असा प्रश्न दादा भुसेंकडून उपस्थित करण्यात आला. त्यांच्या या वक्तव्याचा संजय राऊत यांनी समाचार घेतला आहे.

मुंबई : कांदा निर्यातीच्या शुल्कात केंद्र सरकारने वाढ केल्याने कांदा उत्पादक शेतकरी संतप्त झाला आहे. त्यामुळे राज्यातील अनेक बाजारपेठांमध्ये कांदा निर्यातीत बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आलेला असतानाच याबाबत राज्याचे मंत्री दादा भुसे यांनी संतापजनक वक्तव्य केले आहे. आपण एक-दोन लाख रुपये किमतीचे वाहन वापरतो आणि कांदा दहा-वीस रुपयांनी महाग झाला तर त्या विरोधात आंदोलन सुरू करतो. हे योग्य नाही. ज्यांना कांद्याचा सध्याचा दर परवडत नाही, त्यांनी दोन चार महिने कांदे खाल्ला नाही तर काय बिघडणार आहे? असा प्रश्न दादा भुसेंकडून उपस्थित करण्यात आला. ज्यानंतर आता अनेक राजकीय नेत्यांनी त्यांच्या या वक्तव्याचा निषेध केला आहे. ठाकरे गटाचे खासदार आणि प्रमुख प्रवक्ते असलेले संजय राऊत यांनी देखील त्यांच्या या वक्तव्याचा समाचार घेतला आहे. हे सरकार म्हणत असेल की एखादी गोष्टी मिळत नसेल तर खाऊ नका, तर मग सरकार कशाकरता आहे? असा सवाल राऊतांकडून विचारण्यात आला आहे. (Sanjay Raut pointed out Dada Bhuse on the issue of onion)

हेही वाचा – Onion Price : केंद्र सरकार 2 लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करणार; ‘या’ ठिकाणी उभारणार विशेष खरेदी केंद्र

- Advertisement -

पत्रकार परिषदेत बोलताना संजय राऊत म्हणाले की, यांच्या घरी कांद्याची पोती आहेत आणि सामान्य माणसाला कांदा आणि भाकरी खायची आहे. कांदा हे गरिबांचे खाणे आहे, हे श्रीमंतांचे खाणे नाही. शेतकऱ्यांच्या कांद्याला भाव मिळावा हे आमचे म्हणणे आहे. सामान्य घरातील गृहीणी कांद्यापासून वंचित राहू नये हे आमचे म्हणणे आहे. पण सरकार म्हणत असेल की एखादी गोष्ट मिळत नसेल तर खाऊ नका, तर मग सरकार कशाकरता आहे? हे दीडशहाणे मंत्री कालपर्यंत कृषीमंत्री होते या महाराष्ट्राचे. त्यांना या राज्याची स्थिती माहितेय का? असा संताप राऊतांनी व्यक्त केला.

तसेच, कांद्यामुळे भाजपचे दिल्लीमधील सरकार गेले होते. महाराष्ट्रातही तीच वेळ आली आहे. हा मस्तवालपणा आहे. आम्ही जनतेशी कसेही वागू शकतो, जनतेला काही बोलू शकतो, जनतेला काही सल्ले देऊ शकतो हा मस्तवालपणा आहे. हा मस्तवालपणा खोक्यातून निर्माण झाला आहे. ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. एखादी गोष्ट मिळत नाही म्हणून खाऊ नका, अरे तुम्ही उपलब्ध करून द्या. हा काय सल्ला झाला काय? असा प्रश्न संजय राऊत यांनी पत्रकारांशी बोलताना सरकारला विचारला आहे.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -