घरमहाराष्ट्रअजित पवार काही मोठे नेते नाहीत, शरद पवार भेटीवर संजय राऊतांची प्रतिक्रिया

अजित पवार काही मोठे नेते नाहीत, शरद पवार भेटीवर संजय राऊतांची प्रतिक्रिया

Subscribe

काका आणि पुतण्यामध्ये भेटीगाठी वाढल्याने आता ठाकरे गट आणि काँग्रेस पक्ष मोठ्या संभ्रमावस्थेत पडला आहे. तर शरद पवार हे देखील आता त्यांची राजकीय खेळी खेळत सत्तेत सहभागी होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. परंतु, आता या भेटीवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आपले मत व्यक्त करत प्रतिक्रिया दिली आहे.

मुंबई : शनिवारी (ता. 12 ऑगस्ट) उद्योजक चोरडिया यांच्या पुण्यातील बंगल्यावर शरद पवार आणि अजित पवार यांच्यामध्ये भेट झाली. कौटुंबिक नात्यामुळे ही भेट झाली असल्याची माहिती अजित पवार आणि शरद पवार या दोघांकडूनही देण्यात येत आहे. परंतु, या भेटीनंतर राजकीय वर्तुळात विविध चर्चा सुरू झालेल्या आहेत. अजित पवार यांनी शरद पवार यांना सत्तेत येण्यासाठी पुन्हा विनंती केली असून यासाठीच ही भेट घेतल्याचे सांगण्यात येत आहे. काका आणि पुतण्यामध्ये भेटीगाठी वाढल्याने आता ठाकरे गट आणि काँग्रेस पक्ष मोठ्या संभ्रमावस्थेत पडला आहे. तर शरद पवार हे देखील आता त्यांची राजकीय खेळी खेळत सत्तेत सहभागी होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. परंतु, आता या भेटीवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आपले मत व्यक्त करत प्रतिक्रिया दिली आहे. (Sanjay Raut reaction on Sharad Pawar and Ajit Pawar meeting)

हेही वाचा – …तरच अजितदादांना मुख्यमंत्रीपद, भाजपची अट; वडेट्टीवारांच्या दाव्यानं खळबळ

- Advertisement -

प्रसार माध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, अजित पवार इतके मोठे नेता नाही की ते शरद पवारांना ऑफर देतील. शरद पवारांनी अजित पवारांना बनविले आहे, पवारांना अजित पवारांनी नाही बनवले. 60 वर्षांपेक्षा जास्त काळ ते या राजकारणात आहेत. त्यामुळे त्यांचे पद खूप मोठे आहे. अजित पवार, हसन मुश्रीफ हे नेते त्यांना काय ऑफर देणार. अजित पवार आणि शरद पवार हे नक्कीच कौटुंबिक नात्याने बांधले आहेत. त्यांचे कुटुंब मोठे आहे. काही संस्थांमध्ये ते एकत्र आहेत. त्या संदर्भात काही अडचणी आहेत. पण ते या हयातीमध्ये भाजपसोबत हात मिळवणी करतील असे वाटत नाही. हा मला विश्वास आहे. ते नव्याने पक्ष बांधणीसाठी बाहेर पडले आहेत. एका जिद्दीने ते मैदानात उतरले आहेत. तर जे सोडून गेले त्यांच्याशी काही त्यांचा संबंध नाही, असे त्यांच्या बोलण्यातून वारंवार दिसून येत असते. एखाद्या भेटीतून असे अर्थ काढणे बरोबर नाही.

तसेच, कालच त्यांच्याशी फोनवरून बोलणे झाले. मुंबईमध्ये 31 ऑगस्ट आणि 01 सप्टेंबर या दिवशी इंडिया आघाडीची बैठक होणार आहे. त्या संदर्भातील चर्चा झाली, त्यामुळे ते असे काही करणार नाही, असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला. त्याचप्रमाणे पवार काका – पुतण्यांच्या भेटीचा राजकारणावर काहीही फरक होऊ देणार नाही. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना हे तीन पक्ष एकत्र आहेत आणि राहतील. महाविकास आघाडीमध्ये एकत्र राहतील आणि इंडिया आघाडी एकत्र राहील. अजित पवारांचे राजकारण अजित पवारांकडे. आम्ही एकत्र आहोत आणि राहू, असा दावा संजय राऊत यांच्याकडून करण्यात आला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -