घरमहाराष्ट्रमहाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लावण्याऐवजी केंद्र सरकारच बरखास्त केलं पाहिजे - संजय राऊत

महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लावण्याऐवजी केंद्र सरकारच बरखास्त केलं पाहिजे – संजय राऊत

Subscribe

राज्यातील विरोधी पक्ष मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून सरकारची प्रतिमा मलीन करायचा प्रयत्न करत आहे. भाजप केंद्रीय तपास यंत्रणांना महाराष्ट्रात घुसवून महाराष्ट्राच्या स्वायत्तेवर घाला घालत आहे, अशी टीका शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केली. केंद्रीय यंत्रणांचा कितीही गैरवापर करा, महाविकास आघाडी सरकारला धक्का लागणार नाही. भाजपने केंद्रीय यंत्रणांचा वापर करुन महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याचा प्रयत्न केला. उलट केंद्र सरकारच बरखास्त केले पाहिजे, असे संजय राऊत यांनी म्हटलं आहे. यापुढे आम्ही विरोधकांच्या आरोपांना उत्तरही देणार नाही, असेही राऊत यांनी सांगितलं.

परमबीर सिंग यांच्या पत्राने राज्यात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणाची चौकशी केली जाणार आहे. देशमुख मंत्रिपदावर असताना निष्पक्ष चौकशी होईल का? यावर बोलताना संजय राऊत यांनी जोपर्यंत उद्धव ठाकरे मुख्यमंत्री आहेत. तोपर्यंत सर्वच प्रकरणांची निष्पक्षपणे आणि दबावाशिवाय चौकशी होईल. मुख्यमंत्र्यांना जो निर्णय घ्यायचा तो ते घेतील, असं राऊत म्हणाले. संजय राऊत मुंबईत प्रसार माध्यमांशी बोलत होते.

- Advertisement -

ईडी, सीबीआय, एनआयएला मुख्यालयांसाठी मुंबईत चांगली जागा देऊ

संजय राऊत यांनी केंद्रीय तपास यंत्रणांच्या हस्तक्षेपावर जोरदार टीका केली. महाराष्ट्रात ईडी येऊद्या अथवा इतर कोणी. जी काही चौकशी करायची असेल तर खुशाल करावी. दिल्लीत, देशात कुठे काम नाही आहे. मुंबईत येऊन जर रहायचं असेल तर ईडी, सीबीआय, एनआयएला मुख्यालयांसाठी मुंबईत बीकेसीमध्ये चांगली जागा देऊ, असा खोचक टोला संजय राऊत यांनी लगावला.

प्रकाश आंबेडकरांना पुन्हा एकदा घटनेचा अभ्यास करणं गरजेचं

वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली असून ते राज्यपालांना भेटणार आहेत. यावर बोलताना संजय राऊत यांनी प्रकाश आंबेडकरांना पुन्हा एकदा घटनेचा अभ्यास करणं गरजेचं आहे, असं म्हटलं. “प्रकाश आंबेडकर हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आहेत. बाबासाहेब घटनाकार आहेत. त्यांच्याविषयी आमच्या मनात किती श्रद्धा आहे, हे नव्याने सांगण्याची गरज नाही. महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लावावी असं प्रकाश आंबेडकर सांगत असतील, तर त्यांनी पुन्हा एकदा घटनेचा अभ्यास करणं गरजेचं आहे. कारण ज्या प्रकारे खोटी-नाटी प्रकरणं निर्माण करून विरोधी पक्ष महाराष्ट्र सरकारवर दबाव आणत आहे. यामुळे राष्ट्रपती राजवट लागू शकत नाही किंबहुना केंद्र सरकार बरखास्त केलं पाहिजे. कारण हा राज्याच्या स्वायत्तेवर घाला आहे, असं संजय राऊत म्हणाले.

- Advertisement -

हेही वाचा – परमबीर विरोधकांची ‘डार्लिंग’, पण सरकार बहुमताचं; कुरघोडी कराल तर आग लागेल


 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -