घरताज्या घडामोडीमहाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करा, रामदास आठवलेंची अमित शहांकडे मागणी

महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करा, रामदास आठवलेंची अमित शहांकडे मागणी

Subscribe

राज्यातील बिघडलेली कायदा सुव्यवस्था पाहता मी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करावी अशी मागणी करणार असल्याची माहिती रिपल्बिक पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी केला. मुकेश अंबानी यांच्या घरासमोर आढळलेली स्फोटके, मनसुख हिरेन यांचा मृत्यू, पोलिस अधिकारी सचिन वाझे यांचा सहभाग आणि परमबीर सिंह यांचा लेटरबॉम्ब या सगळ्या प्रकरणामुळे राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था कोलमडली आहे. महाराष्ट्रात दलितांवर अत्याचाराच्या घटनाही वाढलेल्या आहेत. म्हणूनच राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करणे गरजेचे आहे. राज्यातील परिस्थितीबाबतची माहिती देतानाच महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करा अशी मागणी करणारे पत्र अमित शहा यांना देणार असल्याचे आठवले यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले.

महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करा म्हणून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना भेटून मागणी करणार आहे. त्यांच्या कार्यालयात याबाबतचे पत्र देणार असल्याचेही त्यांनी सांगितले. संजय राऊत हे अनिल देशमुख यांना संपुर्ण प्रकरणात पाठीशी घालत असले तरीही प्रत्यक्षात या प्रकरणात गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राजीनामा देण्याची गरज असल्याचे आठवले म्हणाले. माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी अतिशय गंभीर आरोप लावल्याचे आठवले म्हणाले. त्यामुळेच राष्ट्रपती राजवट लावल्याशिवाय दुसरा पर्याय नाही. महाराष्ट्राचा कारभार केंद्राने हातात घेणे गरजेचे आहे. कारण राज्यात परिस्थिती बिघडत चालली आहे. म्हणूनच राष्ट्रपती राजवट करणे आवश्यक ठरेल असे आठवले म्हणाले. शरद पवारांनीच अनिल देशमुख यांचा राजीनामा घेणे आवश्यक होते. पण राष्ट्रवादीचेच अनिल देशमुख असूनही त्यांचा राजीनामा घेतला गेला नसल्याची टीका त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसवर केली. मुंबईच्या माजी पोलिस आयुक्तांनी गृहमंत्र्यांवर लावलेले आरोप अतिशय गंभीर आहेत. त्यामुळेच या प्रकरणाचा चेंडू हा मुख्यमंत्र्यांच्या दरबारी टाकून चालणार नाही असेही त्यांनी सांगितले. अनिल देशमुख्यांच्या विरोधात आरोप करणारे माजी पोलिस आयुक्तांचे पत्र हाच पुरावा असल्याचे त्यांनी सांगितले. तर परमबीर सिंह यांनीही ही माझेच पत्र आहे सांगत सूतोवाच केला असल्याचे आठवले म्हणाले.

- Advertisement -

 

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -