घरताज्या घडामोडीकोल्हापूर कशाला गोव्यातील मतदारसंघांमध्ये ईडी चौकशी लावा, संजय राऊतांचे चंद्रकांत पाटलांना प्रत्युत्तर

कोल्हापूर कशाला गोव्यातील मतदारसंघांमध्ये ईडी चौकशी लावा, संजय राऊतांचे चंद्रकांत पाटलांना प्रत्युत्तर

Subscribe

कोल्हापूरमध्ये मतदारांच्या खात्यात पेटीएमद्वारे पैसे पाठवण्याचा प्रयत्न होत आहे. मतदारांच्या खात्यात पैसे ट्रान्सफर झाल्यावर ईडी चौकशीसाठी पत्र लिहिणार असल्याचा इशारा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिला आहे. यावर शिवसेना खासदार संजय राऊतांनी प्रत्युत्तर देताना महाराष्ट्र कशाला गोव्यातील २ आणि पाच राज्यांतील मतदारासंघात ईडी चौकशी लावा असा पलटवार केला आहे. चंद्रकांत पाटील यांचे वक्तव्य मनोरंजक असल्याचा टोला संजय राऊतांनी लगावला आहे. कोल्हापूरमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी मतदारांची माहिती आणि मोबाईल नंबर गोळा करण्यात येत आहे असा आरोप चंद्रकांत पाटील यांनी केला होता.

शिवसेना खासदार चंद्रकांत पाटील यांनी भाजप प्रदेशाध्याक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर घणाघात केला आहे. कोल्हापूरातील मतदारांना हजार रुपये पेटीएमद्वारे वाटण्यात येत असल्याचा आरोप पाटील यांनी केला होता. तसेच याची ईडी चौकशीची मागणी करणार असल्याचे पाटील यांनी केली होती. यावर संजय राऊत म्हणाले की, कोल्हापूर उत्तरची कशाला गोव्यात पणजी मतदारसंघ आणि साखळी मतदारसंघातील मतदारांवर आधी ईडी लावा, उत्तर प्रदेशमध्येही काही मतदरासंघात ईडी चौकशी लावा, इतर राज्यांच्या मतदारसंघातही जरी भाजपचा पराभव झाला असला तरी ईडी लावणे महत्त्वाचे आहे. चंद्रकांत पाटील यांनी चांगली सूचना केली आहे. असे संजय राऊत म्हणाले.

- Advertisement -

गोव्यात दोन मतदारसंघ

गोव्यात दोन मतदारसंघ आहेत. गोव्यातील पणजी मतदारसंघात जिथे उत्पल पर्रिकर पराभूत झाले आणि साखळी मतदारसंघ ज्या ठिकाणी मुख्यमंत्री प्रमोद सांवत विजयी झाले या दोन्ही मतदारसंघात ईडी चौकशी लावली तर त्याचे आम्ही स्वागत करु, चंद्रकांत पाटील यांचे वक्तव्य फार मनोरंजक आहे. महाराष्ट्राचे आपण नंतर पाहू असे संजय राऊत म्हणाले. सुरुवात या पाच राज्यांतून झाली पाहिजे. निकाल, मतदारांवर निर्माण झालेला प्रभाव याची ईडी चौकशी होणे गरजेचे आहे. चंद्रकांत पाटील यांनी पुढाकार घेतला तर त्यांच्या खांद्याला खांदा लावून या लढाईत त्यांच्यासोबत उभा राहील असे संजय राऊत म्हणाले.

मतदार आणि उमेदवारांची ईडी चौकशी – चंद्रकांत पाटील

एका शिक्षण संस्थेचे तरुण-तरुणी घरोघरी फिरुन एक फॉर्म भरुन घेत आहेत. नाव, वय, फोन नंबर काय अशी माहिती गोळा करण्यात येत आहे. याची चौकशी निवडणूक आयोगाने केली पाहिजे. १ हजार रुपये प्रति माणसं खात्यात आल्यावरसुद्धा ईडी चौकशी करेल. हे पैसे आले कुठून आणि ज्याने पाठवले त्याला मिळाले कुठून, पेटीएमचा नंबर घेतल्याशिवाय पैसे पाठवता येत नाही. त्यामुळे ईडीला पत्र लिहिणार आहोत की, काळा पैसा मतदारांच्या खात्यात पाठवण्यात येणार आहे. याची चौकशी करण्यात यावी असा इशारा चंद्रकांत पाटील यांनी दिला आहे.

- Advertisement -

हेही वाचा : शरद पवारांशिवाय मोदींना पर्याय आणि विरोधकांची एकजूट शक्य नाही, संजय राऊतांचे वक्तव्य

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -