घरमहाराष्ट्रसरकार व मुख्यमंत्री कार्यालयाचा पोलिसांवर दबाव- प्रवीण दरेकर

सरकार व मुख्यमंत्री कार्यालयाचा पोलिसांवर दबाव- प्रवीण दरेकर

Subscribe

बोगस मजूर प्रकरणी केसमध्ये पोलिसांना सहकार्याची भूमिका माझी होती. या प्रकरणी पोलिसांवर सरकारने दबाव आणला आणि तक्रात दाखल करून घेतली आहे. सरकार पूर्वगृह दूषित कारवाई करत आहे, असा आरोपही दरेकर यांनी केला आहे.

मुंबै बँकेच्या संचालकपदी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांची मजूर म्हणून झालेली निवड अपात्र ठरवल्यानंतर त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी मुंबई पोलिसांनी प्रवीण दरेकर यांना नोटीस बजावली असून, त्यांना सोमवारी सकाळी ११ वाजता माता रमाबाई आंबेडकर पोलीस ठाण्यात हजर राहण्याच्या सूचना दिल्या. यावर आता प्रविण दरेकर यांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधाला आहे. तसंच, ‘बोगस मजूर प्रकरणी केसमध्ये पोलिसांना सहकार्याची भूमिका माझी होती. या प्रकरणी पोलिसांवर सरकारने दबाव आणला आणि तक्रात दाखल करून घेतली आहे. सरकार पूर्वगृह दूषित कारवाई करत आहे’, असा आरोपही दरेकर यांनी केला आहे.

सोमवारी सकाळी माता रमाबाई आंबेडकर पोलीस ठाण्यात हजर होण्यापूर्वी प्रवीण दरेकर यांनी पत्रकार परिषद घेत सरकारचा आणि मुख्यमंत्री कार्यालयाचा पोलिसांवर दबाव असल्याचा आरोप केला. यावेळी त्यांनी “पोलिसांना घाई झाली होती आणि सरकारचा एवढा दबाव होता की, आमची मागणी होती की 41A ची नोटीस पाठवून याप्रकरणी तपास आणि चौकशी करावी. त्यानंतर कारवाई करा. परंतु, कोर्टात टीको अथवा न टीको आपण FIR दाखल करा, कारवाई करा अशाप्रकारचा हट्टाहास सरकारचा आणि प्रामुख्यानं मुख्यमंत्री कार्यालयाचा होता. याच दबावाखाली एफआयआर दाखल करण्यात आला आणि तीनवेळा सेशन कोर्टात तीनवेळा दिलासा मिळाला. त्यानंतर उच्च न्यायालयाच दिलासा मिळाला. त्यानंतर १२ तारखेला ड्यू प्रोसेस ऑफ लॉनुसार कायदेशीर प्रक्रिय पुर्ण करायची होती ती केली की नाही अशाप्रकारचा प्रश्न उद्भवू शकतो. त्यामुळं 41A ची मुंबई पोलिसांकडून पाठवण्यात आली. पोलिसांच्या नोटीसला सकारात्मक प्रतिसाद देणार आहे. माता रमाबाई आंबेडकर पोलीस ठाण्यात हजर राहणार आहे. पोलिसांना हवी असलेली सर्व माहिती देऊ. तपास यंत्रणांना दोष देणार नाही”, असं म्हटलं.

- Advertisement -

”हायकोर्टात आम्हाला दिलासा मिळाला आहे. 41 ए च्या नोटीसचे आम्ही स्वागत करतो. मी पोलीस ठाण्यात जाणार आहे. पोलिसांनी जी माहिती हवी आहे ती माहिती मी त्यांना देणार आहे. मी तपास यंत्रणा सरकारच्या दबावाखाली काम करत आहेत असे न म्हणता तपासाला सामोरे जाणार आहे. हा एवढा मोठा विषय नाही पण यांच्याकडून पराचा कावळा केला जात आहे. मी कार्यकर्त्याना आवाहन करतो कुठलीही गडबड गोंधळ करू नका”, असंही दरेकर यांनी म्हटलं. तसंच, मी बँकेचा सदस्य होतो तेव्हा मजूर होतो. मजुराने प्रगती करू नये असे कुठे आहे का? असा सवालही प्रवीण दरेकर यांनी यावेळी उपस्थित केला.

आम आदमी पार्टीचे कार्यकर्ते धनंजय शिंदे यांनी प्रवीण दरेकर यांच्या विरोधात तक्रार दिली होती. त्यानंतर दरेकरांना विरोधात गुन्हा दाखल झाला होता. याप्रकरणी मुंबई पोलिसांनी प्रवीण दरेकर यांना नोटीस बजावली असून, त्यांना सोमवारी सकाळी ११ वाजता माता रमाबाई आंबेडकर पोलीस ठाण्यात हजर राहण्याच्या सूचना दिल्या होत्या.

- Advertisement -

हेही वाचा – शरद पवारांशिवाय मोदींना पर्याय आणि विरोधकांची एकजूट शक्य नाही, संजय राऊतांचे वक्तव्य

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -